S M L

रनर बंदीला सुनील गावसकरांचा विरोध

28 जूनवन-डे क्रिकेटमधून रनरला बॅन केल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आयसीसीच्या बैठकीत एकमताने या नियमाला पाठिंबा दिला गेला मात्र इतर माजी खेळाडूंना हा नियम रूचला नाही. आणि भारताचा माजी कॅप्टन सुनिल गावसकरही यांनीही या नियमाला विरोध केला. बॅट्समनला मैदानात दुखापत झाली तर तो आता रनर मैदानावर बोलवू शकत नाही. आयसीसीच्या नवीन नियमावलीप्रमाणे आता बॅट्समनला पीचवर धावताना त्रास होत असेल तर त्याला थेट पॅव्हेलियन गाठावं लागेल. आयसीसीच्या या नवीन नियमांचे क्रिकेट वर्तूळात स्वागत झालं असलं तरी काही माजी खेळाडूंनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली. भारताचा माजी कॅप्टन सुनिल गावसकर यांनीही या नियमाला विरोध केला. जर बॅट्समनला रनर मिळणार नसेल तर बॉलरलाही प्रत्येक ओव्हर संपल्यावर पाणी प्यायची सवय लागलीय. ती बंद झाली पाहिजे. बॉलर्स एक ओव्हर टाकतात आणि एनर्जी ड्रिंक ब्राऊंड्रीवर त्यांच्यासाठी तयार असतात. शिवाय फिल्डरही दुखापतग्रस्त झाला तर त्याला बदली खेळाडू मिळू नये असं स्पष्ट मत सुनिल गावसकर यांने व्यक्त केलं.गावसकर यांनी जरी या नियमाला विरोध केला असला तरी रनरचा चुकीच्या पद्धतीने वापर होत होता असं इतिहास सांगतो. श्रीलंकेचा माजी कॅप्टन अर्जूना रणतुंगा खोटी दुखापत सांगून रनर मागवायचा. सईद अन्वरने ऐतिहासिक 194 रन्स केले होते त्यावेळीही त्याने रनरचा वापर केला होता. पण रनर न वापरण्याचया नियमावरची चर्चा फारशी रंगली नाही. कारण दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आयसीसीने घेतला होता. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. अंपायर डिसिजन रेफरल सिस्टिम अर्थात युडीआरएसची सुधारित आवृत्ती टेस्ट मॅचेसमध्ये अनिवार्य करण्यात आली. मात्र हॉक आय तंत्रज्ञानाला काही जणांचा विरोध होता. त्यामुळे हे तंत्रज्ञान सध्या वापरलं जाणार नाही. एका इनिंगमध्ये दोन बॉल वारण्याच्या नवीन नियमामुळे वन-डे क्रिकेटमध्ये अजून मजा येईल अशी आशा आयसीसीला वाटते आणि त्यातच 16 ते 40 या ओव्हर्सच्या दरम्यानच बॅटींग आणि बॉलिंग पॉवर प्ले वापरता येणार असल्याने रंगत अजूनच वाढेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2011 05:59 PM IST

रनर बंदीला सुनील गावसकरांचा विरोध

28 जून

वन-डे क्रिकेटमधून रनरला बॅन केल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आयसीसीच्या बैठकीत एकमताने या नियमाला पाठिंबा दिला गेला मात्र इतर माजी खेळाडूंना हा नियम रूचला नाही. आणि भारताचा माजी कॅप्टन सुनिल गावसकरही यांनीही या नियमाला विरोध केला.

बॅट्समनला मैदानात दुखापत झाली तर तो आता रनर मैदानावर बोलवू शकत नाही. आयसीसीच्या नवीन नियमावलीप्रमाणे आता बॅट्समनला पीचवर धावताना त्रास होत असेल तर त्याला थेट पॅव्हेलियन गाठावं लागेल. आयसीसीच्या या नवीन नियमांचे क्रिकेट वर्तूळात स्वागत झालं असलं तरी काही माजी खेळाडूंनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली. भारताचा माजी कॅप्टन सुनिल गावसकर यांनीही या नियमाला विरोध केला.

जर बॅट्समनला रनर मिळणार नसेल तर बॉलरलाही प्रत्येक ओव्हर संपल्यावर पाणी प्यायची सवय लागलीय. ती बंद झाली पाहिजे. बॉलर्स एक ओव्हर टाकतात आणि एनर्जी ड्रिंक ब्राऊंड्रीवर त्यांच्यासाठी तयार असतात. शिवाय फिल्डरही दुखापतग्रस्त झाला तर त्याला बदली खेळाडू मिळू नये असं स्पष्ट मत सुनिल गावसकर यांने व्यक्त केलं.

गावसकर यांनी जरी या नियमाला विरोध केला असला तरी रनरचा चुकीच्या पद्धतीने वापर होत होता असं इतिहास सांगतो. श्रीलंकेचा माजी कॅप्टन अर्जूना रणतुंगा खोटी दुखापत सांगून रनर मागवायचा. सईद अन्वरने ऐतिहासिक 194 रन्स केले होते त्यावेळीही त्याने रनरचा वापर केला होता.

पण रनर न वापरण्याचया नियमावरची चर्चा फारशी रंगली नाही. कारण दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आयसीसीने घेतला होता. ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. अंपायर डिसिजन रेफरल सिस्टिम अर्थात युडीआरएसची सुधारित आवृत्ती टेस्ट मॅचेसमध्ये अनिवार्य करण्यात आली. मात्र हॉक आय तंत्रज्ञानाला काही जणांचा विरोध होता. त्यामुळे हे तंत्रज्ञान सध्या वापरलं जाणार नाही.

एका इनिंगमध्ये दोन बॉल वारण्याच्या नवीन नियमामुळे वन-डे क्रिकेटमध्ये अजून मजा येईल अशी आशा आयसीसीला वाटते आणि त्यातच 16 ते 40 या ओव्हर्सच्या दरम्यानच बॅटींग आणि बॉलिंग पॉवर प्ले वापरता येणार असल्याने रंगत अजूनच वाढेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2011 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close