S M L

पुण्यात पेट्रोल - डिझेलच्या किमतीत 60 पैशांची कपात

28 जूनपेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे सामान्य माणूस भरडला जात असतानाच पुणेकरांना मात्र किंचितस दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारी जकात 2 टक्क्यांवरुन 1 टक्का करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत 60 पैशाने कमी होणार आहे. मात्र यासाठी राज्य शासनाची परवानगी घेतल्यानंतरच हा दर कमी होणार आहे.पुणे महानगरपालिकेला पेट्रोलवर 39 कोटी रुपये तर डिझेलवर 7 कोटी रुपये जकात अपेक्षित होता. परंतु जनक्षोभ बघता हा जकात थोडातरी कमी करण्याची बुद्धी पालिकेला सुचली असेच म्हणावे लागेल. डिझेलच्या दरात 5 रुपयाने झालेली वाढ लक्षात घेता केवळ 60 प्ैाशाने कमी झालेला हा दर म्हणजे नक्कीच पुणेकरांना हा फार मोठा दिलासा नाही. या जकात कपातीमुळे महापालिकेला 25 कोटींचा फटका बसणार आहे अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर यांनी दिली. याचा परिणाम शहराच्या विकास कामांसाठी दिल्या जाणार्‍या बजेटवर होईल. म्हणूनच संपूर्ण जकात माफी करणं शक्य नाही असंही त्यांनी सांगितलं. पुण्यातील कोथरुड येथे होणार्‍या शिवसृष्टीबद्दल त्यांनी माहिती दिली. या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून संदिप शिरके आणि नितन देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवकालीन वातावरण निमिर्तीसह येथे म्युझियम आणि तारांकित हॉटेल देखिल होणार आहे. 8 कोटी 80 लाखाचे बजेट यासाठी देण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 28, 2011 06:10 PM IST

पुण्यात पेट्रोल - डिझेलच्या किमतीत 60 पैशांची कपात

28 जून

पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे सामान्य माणूस भरडला जात असतानाच पुणेकरांना मात्र किंचितस दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणारी जकात 2 टक्क्यांवरुन 1 टक्का करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पेट्रोल आणि डिझेलची किंमत 60 पैशाने कमी होणार आहे. मात्र यासाठी राज्य शासनाची परवानगी घेतल्यानंतरच हा दर कमी होणार आहे.

पुणे महानगरपालिकेला पेट्रोलवर 39 कोटी रुपये तर डिझेलवर 7 कोटी रुपये जकात अपेक्षित होता. परंतु जनक्षोभ बघता हा जकात थोडातरी कमी करण्याची बुद्धी पालिकेला सुचली असेच म्हणावे लागेल. डिझेलच्या दरात 5 रुपयाने झालेली वाढ लक्षात घेता केवळ 60 प्ैाशाने कमी झालेला हा दर म्हणजे नक्कीच पुणेकरांना हा फार मोठा दिलासा नाही.

या जकात कपातीमुळे महापालिकेला 25 कोटींचा फटका बसणार आहे अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष गणेश बिडकर यांनी दिली. याचा परिणाम शहराच्या विकास कामांसाठी दिल्या जाणार्‍या बजेटवर होईल. म्हणूनच संपूर्ण जकात माफी करणं शक्य नाही असंही त्यांनी सांगितलं.

पुण्यातील कोथरुड येथे होणार्‍या शिवसृष्टीबद्दल त्यांनी माहिती दिली. या प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून संदिप शिरके आणि नितन देसाई यांची नेमणूक करण्यात आली आहे. शिवकालीन वातावरण निमिर्तीसह येथे म्युझियम आणि तारांकित हॉटेल देखिल होणार आहे. 8 कोटी 80 लाखाचे बजेट यासाठी देण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 28, 2011 06:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close