S M L

सांगलीत ऑईल डेपोमध्ये टँकर चालकांचा बेमुदत संप

29 जूनसांगली जिल्ह्यातील मिरज येथे इंडियन ऑईल डेपोमध्ये वेगवेगळ्या मागण्यांसाठी टँकर चालक आणि क्लिनर्सनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे 272 टँकर डेपो परिसरातच उभे राहिले आहे. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या पाच जिल्ह्यांना मिरजेच्या इंडियन ऑइलच्या डेपोतून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होतो. पण संपामुळे या 5 जिल्ह्यात आज हा पुरवठा झाला नाही. डेेपोतून टँकर भरले जात असताना या चालकंाना रोजच्या रोज कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी लागते. या डेपोत रोज सुमारे 300 टँकर चालक-क्लिनर्स यांची येजा होते. या लोकांसाठी स्वच्छता गृह आणि पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही. टँकर ट्रॅकिंग सुविधा नादुरुस्त असल्याने टँकरचे लोकेशन चुकीचं मिळतं. या सर्व उणिवा दूर कराव्यात या मागणीसाठी टँकर चालक आणि क्लीनर्सनी संप पुकारला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2011 01:23 PM IST

सांगलीत ऑईल डेपोमध्ये टँकर चालकांचा बेमुदत संप

29 जून

सांगली जिल्ह्यातील मिरज येथे इंडियन ऑईल डेपोमध्ये वेगवेगळ्या मागण्यांसाठी टँकर चालक आणि क्लिनर्सनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे 272 टँकर डेपो परिसरातच उभे राहिले आहे. सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या पाच जिल्ह्यांना मिरजेच्या इंडियन ऑइलच्या डेपोतून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होतो.

पण संपामुळे या 5 जिल्ह्यात आज हा पुरवठा झाला नाही. डेेपोतून टँकर भरले जात असताना या चालकंाना रोजच्या रोज कागदपत्रांची तपासणी करून घ्यावी लागते. या डेपोत रोज सुमारे 300 टँकर चालक-क्लिनर्स यांची येजा होते.

या लोकांसाठी स्वच्छता गृह आणि पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही. टँकर ट्रॅकिंग सुविधा नादुरुस्त असल्याने टँकरचे लोकेशन चुकीचं मिळतं. या सर्व उणिवा दूर कराव्यात या मागणीसाठी टँकर चालक आणि क्लीनर्सनी संप पुकारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2011 01:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close