S M L

एसटीची भाडेवाढ 8 ते 9 टक्क्याने होण्याची शक्यता

29 जूनडिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना आणखी फटका बसणार आहे. या दरवाढीमुळे एसटीच्या तिकीट दरात ही वाढ होण्याची शक्यता आहे. एसटीच्या तिकीट दरात जवळपास 8 ते 9 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती एस.टी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी दिली. डिझेल दरवाढीमुळे ही दरवाढ अटळ असल्याचं परिचारक यांनी म्हटलं आहे.दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे वर्षाला 128 कोटींचे नुकसान होणार आहे. एसटीला दरदिवशी 10 ते 11 लाख लीटर डिझेल लागतं. या दरवाढीमुळे दररोज 30 ते 33 लाखांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2011 09:22 AM IST

एसटीची भाडेवाढ 8 ते 9 टक्क्याने होण्याची शक्यता

29 जून

डिझेलच्या दरवाढीमुळे सामान्यांना आणखी फटका बसणार आहे. या दरवाढीमुळे एसटीच्या तिकीट दरात ही वाढ होण्याची शक्यता आहे. एसटीच्या तिकीट दरात जवळपास 8 ते 9 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची माहिती एस.टी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी दिली. डिझेल दरवाढीमुळे ही दरवाढ अटळ असल्याचं परिचारक यांनी म्हटलं आहे.

दरवाढीमुळे एसटी महामंडळाचे वर्षाला 128 कोटींचे नुकसान होणार आहे. एसटीला दरदिवशी 10 ते 11 लाख लीटर डिझेल लागतं. या दरवाढीमुळे दररोज 30 ते 33 लाखांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2011 09:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close