S M L

डिझेल 72 पैशांनी स्वस्त

29 जूनमागील आठवड्यात केंद्र सरकारने महागाईच्या आगीत डिझेल, सिलेंडरच्या दरात वाढ करून भडका उडवून दिला. मात्र आज सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. आता राज्य सरकारने डिझेल आणि केरोसीनवरच्या व्हॅटमध्ये दोन टक्क्यांची कपात केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कपातीमुळे डिझेल फक्त 72 पैसे तर केरोसीन फक्त 28 पैशांनी स्वस्त होणार आहे.डिझेल आणि रॉकेलवरच्या व्हॅटमध्ये प्रत्येकी 2 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या मुद्यावर मंत्रिमंडळात एकमत झालं. डिझेल आणि केरोसीनच्या व्हॅटमध्ये प्रत्येकी 2 टक्यांनी कपात करण्यात आली आहे.त्यामुळे आता डिझेल 72 पैशांने स्वस्त होणार आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाण्यात 26 टक्के ऐवजी आता 24 टक्के व्हॅटची आकारणी होईल. तर उर्वरीत राज्यात 23 ऐवजी 21 टक्के व्हॅट आकारला जाणार आहे. या कपातीमुळे डिझेलचा दर लिटरमागे 72 पैशांनी कमी होणार आहे. तर केरोसीन लिटरमागे 28 पैशै कमी होणार आहे.यामुळे राज्याच्या तिजोरीवर 416 कोटी रुपयाचा भार वाढणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2011 11:09 AM IST

डिझेल 72 पैशांनी स्वस्त

29 जून

मागील आठवड्यात केंद्र सरकारने महागाईच्या आगीत डिझेल, सिलेंडरच्या दरात वाढ करून भडका उडवून दिला. मात्र आज सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. आता राज्य सरकारने डिझेल आणि केरोसीनवरच्या व्हॅटमध्ये दोन टक्क्यांची कपात केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या कपातीमुळे डिझेल फक्त 72 पैसे तर केरोसीन फक्त 28 पैशांनी स्वस्त होणार आहे.

डिझेल आणि रॉकेलवरच्या व्हॅटमध्ये प्रत्येकी 2 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. या मुद्यावर मंत्रिमंडळात एकमत झालं. डिझेल आणि केरोसीनच्या व्हॅटमध्ये प्रत्येकी 2 टक्यांनी कपात करण्यात आली आहे.

त्यामुळे आता डिझेल 72 पैशांने स्वस्त होणार आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाण्यात 26 टक्के ऐवजी आता 24 टक्के व्हॅटची आकारणी होईल. तर उर्वरीत राज्यात 23 ऐवजी 21 टक्के व्हॅट आकारला जाणार आहे. या कपातीमुळे डिझेलचा दर लिटरमागे 72 पैशांनी कमी होणार आहे. तर केरोसीन लिटरमागे 28 पैशै कमी होणार आहे.यामुळे राज्याच्या तिजोरीवर 416 कोटी रुपयाचा भार वाढणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2011 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close