S M L

अवघी जेजुरी सोन्याची होऊन गेली ; जेजुरीत माऊलींचा मुक्काम

29 जूनज्ञानोबा माऊलींची पालखी जेजुरीत पोचली ती भंडार्‍याची बहारदार उधळण अंगावर घेतच. सकाळपासूनच जेजुरीकरांना वाट होती ती माऊलींची पालखी कधी येतीये याची. मग ऐन मावळतीच्या वेळी माऊलींनी जेजुरीच्या शिवारात प्रवेश केला आणि खंडेरायाच्या या भूमीत एक आनंद आणि उत्साहाची लहरच पसरली. जशी पालखी पुढ सरकू लागली. तशी खोबरं - भंडार्‍यांची एकच उधळण पालखीवर सुरू झाली आणि मग बघता बघता अवघी जेजुरी सोन्याची होऊन गेली. मानाचे अश्व, रथ, छत्र, अब्दागिर्‍या, मानकरी, वारकरी सगळे सगळे अगदी या सोनेरी भंडार्‍यात न्हाऊल निघाले. मल्हारी रायाच्या दर्शनाने ज्ञानिया धन्य झालेआणि ज्ञानियांच्या दर्शनाने अवघे जेजुरीकर....! या अभूतपूर्व स्वागतानंतर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम जेजुरीत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jun 29, 2011 02:49 PM IST

अवघी जेजुरी सोन्याची होऊन गेली ;  जेजुरीत माऊलींचा मुक्काम

29 जून

ज्ञानोबा माऊलींची पालखी जेजुरीत पोचली ती भंडार्‍याची बहारदार उधळण अंगावर घेतच. सकाळपासूनच जेजुरीकरांना वाट होती ती माऊलींची पालखी कधी येतीये याची. मग ऐन मावळतीच्या वेळी माऊलींनी जेजुरीच्या शिवारात प्रवेश केला आणि खंडेरायाच्या या भूमीत एक आनंद आणि उत्साहाची लहरच पसरली. जशी पालखी पुढ सरकू लागली.

तशी खोबरं - भंडार्‍यांची एकच उधळण पालखीवर सुरू झाली आणि मग बघता बघता अवघी जेजुरी सोन्याची होऊन गेली. मानाचे अश्व, रथ, छत्र, अब्दागिर्‍या, मानकरी, वारकरी सगळे सगळे अगदी या सोनेरी भंडार्‍यात न्हाऊल निघाले. मल्हारी रायाच्या दर्शनाने ज्ञानिया धन्य झालेआणि ज्ञानियांच्या दर्शनाने अवघे जेजुरीकर....! या अभूतपूर्व स्वागतानंतर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम जेजुरीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 29, 2011 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close