S M L

धोतराच्या पायघड्या घालून तुकोबांच्या पालखीचे स्वागत

02 जुलैतुकोबांच्या पालखीचे काटेवाडीत जोरदार स्वागत करण्यात आलं. तुकोबांच्या पालखीचे आगमन म्हणजे काटेवाडीसाठी सणच होय. येथील परीट समाजाने शुभ्र धोतर वस्त्राच्या पायघड्या घालत पालखीचं स्वागत केलं. सकाळपासूनच पालखीची वाट पाहणार्‍या काटेवाडीकरांनी वेशीपाशी पालखी येताच एकच जयघोष करत पालखीला मिरवत आणलं. त्यानंतर पालखीला खांद्यावर घेऊन काटेवाडीकरांनी वेशीपासून ते पालखीतळापर्यंत मिरवत नेलं. त्याआधी सकाळी रांगोळ्यांनी पालखीचा रस्ता सजवून काटेवाडीच्या महिलांनी पालखीच्या स्वागताची जोरदार तयारीही केली होती. आता पालखी थोडा विसावा घेईल आणि मग दुपारी अडीचच्या सुमारास प्रसिद्ध असं मेंढ्यांचं रिंगण रंगेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2011 09:48 AM IST

धोतराच्या पायघड्या घालून तुकोबांच्या पालखीचे स्वागत

02 जुलै

तुकोबांच्या पालखीचे काटेवाडीत जोरदार स्वागत करण्यात आलं. तुकोबांच्या पालखीचे आगमन म्हणजे काटेवाडीसाठी सणच होय. येथील परीट समाजाने शुभ्र धोतर वस्त्राच्या पायघड्या घालत पालखीचं स्वागत केलं. सकाळपासूनच पालखीची वाट पाहणार्‍या काटेवाडीकरांनी वेशीपाशी पालखी येताच एकच जयघोष करत पालखीला मिरवत आणलं.

त्यानंतर पालखीला खांद्यावर घेऊन काटेवाडीकरांनी वेशीपासून ते पालखीतळापर्यंत मिरवत नेलं. त्याआधी सकाळी रांगोळ्यांनी पालखीचा रस्ता सजवून काटेवाडीच्या महिलांनी पालखीच्या स्वागताची जोरदार तयारीही केली होती. आता पालखी थोडा विसावा घेईल आणि मग दुपारी अडीचच्या सुमारास प्रसिद्ध असं मेंढ्यांचं रिंगण रंगेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2011 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close