S M L

सांगलीत चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव उत्साहात

2 जुलैचौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव यंदा सांगलीत पार पडला. मुळचा कर्नाटकी असलेला हा उत्सव बदामी गावाचा एक खेळ आहे. चंडमुंड राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने चंडीचा अवतार घेतला. आणि सलग पाच दिवस त्यांच्याशी युद्ध करुन त्यांचा संहार केला. याच पद्धतीने सांगलीतल्या आष्टा गावात हा उत्सव खेळला जातो. यात मुखवटे घातलेल्या राक्षसाचा संहार देवी करते. यात दैत्य आणि देवी यांच्या सीमारेषा ठरलेल्या असतात. मुखवटा जसा पाठीमागे सरकेल तसं खेळवत खेळवत देवी दैत्याला आपल्या हद्दीत आणते आणि त्याचा संहार करते. छांज, ढोल ताश्यांच्या आवाजात हा दैत्य आणि देवीचा खेळ रंगतो. अंबाबाई मंदिरापासून ते गणपती मंदिर, गांधी चौक, मारुती मंदिर अशा पाच ठिकाणी हा खेळ रंगतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2011 08:06 AM IST

सांगलीत चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव उत्साहात

2 जुलै

चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव यंदा सांगलीत पार पडला. मुळचा कर्नाटकी असलेला हा उत्सव बदामी गावाचा एक खेळ आहे. चंडमुंड राक्षसाचा वध करण्यासाठी देवीने चंडीचा अवतार घेतला. आणि सलग पाच दिवस त्यांच्याशी युद्ध करुन त्यांचा संहार केला.

याच पद्धतीने सांगलीतल्या आष्टा गावात हा उत्सव खेळला जातो. यात मुखवटे घातलेल्या राक्षसाचा संहार देवी करते. यात दैत्य आणि देवी यांच्या सीमारेषा ठरलेल्या असतात. मुखवटा जसा पाठीमागे सरकेल तसं खेळवत खेळवत देवी दैत्याला आपल्या हद्दीत आणते आणि त्याचा संहार करते.

छांज, ढोल ताश्यांच्या आवाजात हा दैत्य आणि देवीचा खेळ रंगतो. अंबाबाई मंदिरापासून ते गणपती मंदिर, गांधी चौक, मारुती मंदिर अशा पाच ठिकाणी हा खेळ रंगतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2011 08:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close