S M L

इंग्लंड दौर्‍यासाठी सीनिअर्स खेळाडूंचे कमबॅक

02 जुलैइंग्लंड दौर्‍यात होणार्‍या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची आज घोषणा करण्यात आली. के श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली चेन्नईत 17 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे सीनिअर्सनी कमबॅक केलं आहे. सचिन तेंडुलकर या दौर्‍यावर खेळणार आहे तर दुखापतीमुळे वीरेंद्र सेहवाग इंग्लंड विरूद्धची पहिली टेस्ट खेळू शकणार नाही पण दुसरी टेस्टसाठी तो उपलब्ध असेल. ओपनर गौतम गंभीरने या दौर्‍यासाठी आपण पूर्णपणे फिट असल्याचे बोर्डाला कळवलंय होतं. याशिवाय फास्ट बॉलर एस श्रीसंत, युवराज सिंग यांनाही कमबॅक केलं आहे. टीममध्ये दुसरा विकेटकिपर म्हणून पार्थिव पटेल ऐवजी वृद्धीमान साहाला स्थान मिळाले आहे. ओपनिंग बॅट्समनसाठी मुरली विजय ऐवजी अभिनव मुकूंदने बाजी मारली आहे. मुरली विजय विंडीज दौर्‍यात सतत अपयशी ठरतोयं तर मुकूंदने दुसर्‍या टेस्टमध्ये 48 रन्स करत इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी स्थान पक्क केलं. विराट कोहलीला मात्र टीममधून डच्चू मिळाला आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यानची पहिली टेस्ट मॅच 21 ते 25 जुलैदरम्यान ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवली जाणार आहे. तर दुसरी टेस्ट मॅच 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान ट्रेंटब्रीजला होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 2, 2011 05:30 PM IST

इंग्लंड दौर्‍यासाठी सीनिअर्स खेळाडूंचे कमबॅक

02 जुलै

इंग्लंड दौर्‍यात होणार्‍या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीमची आज घोषणा करण्यात आली. के श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली चेन्नईत 17 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे सीनिअर्सनी कमबॅक केलं आहे. सचिन तेंडुलकर या दौर्‍यावर खेळणार आहे तर दुखापतीमुळे वीरेंद्र सेहवाग इंग्लंड विरूद्धची पहिली टेस्ट खेळू शकणार नाही पण दुसरी टेस्टसाठी तो उपलब्ध असेल.

ओपनर गौतम गंभीरने या दौर्‍यासाठी आपण पूर्णपणे फिट असल्याचे बोर्डाला कळवलंय होतं. याशिवाय फास्ट बॉलर एस श्रीसंत, युवराज सिंग यांनाही कमबॅक केलं आहे. टीममध्ये दुसरा विकेटकिपर म्हणून पार्थिव पटेल ऐवजी वृद्धीमान साहाला स्थान मिळाले आहे.

ओपनिंग बॅट्समनसाठी मुरली विजय ऐवजी अभिनव मुकूंदने बाजी मारली आहे. मुरली विजय विंडीज दौर्‍यात सतत अपयशी ठरतोयं तर मुकूंदने दुसर्‍या टेस्टमध्ये 48 रन्स करत इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी स्थान पक्क केलं.

विराट कोहलीला मात्र टीममधून डच्चू मिळाला आहे. भारत आणि इंग्लंडदरम्यानची पहिली टेस्ट मॅच 21 ते 25 जुलैदरम्यान ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळवली जाणार आहे. तर दुसरी टेस्ट मॅच 29 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान ट्रेंटब्रीजला होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2011 05:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close