S M L

माऊलींच्या पालखीचे फलटणमध्ये शाही स्वागत

03 जुलैज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज फलटणमध्ये असणार आहे. वारकर्‍यांची दिंडी नुकतीच फलटणमध्ये दाखल झाली आहे. प्रथेप्रमाणे नाईक निंबाळकर परिवाराकडून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं शाही स्वागत करण्यात येतं. हा शाही स्वागताचा सोहळा आटोपल्यानंतर नगर प्रदक्षिणा करून पालखी विसावा स्थळी प्रस्थान करेल. फलटणमधल्या शाही स्वागताबद्दल एकंदरच वारकर्‍यांमध्ये आणि फलटणकरांमध्ये ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची उत्सूकता असते. वर्षानुवर्षे फलटणच्या मुधोजी मनमोहन राजवाड्यासमोर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जंगी स्वागत होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 3, 2011 03:16 PM IST

माऊलींच्या पालखीचे फलटणमध्ये शाही स्वागत

03 जुलै

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज फलटणमध्ये असणार आहे. वारकर्‍यांची दिंडी नुकतीच फलटणमध्ये दाखल झाली आहे. प्रथेप्रमाणे नाईक निंबाळकर परिवाराकडून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं शाही स्वागत करण्यात येतं. हा शाही स्वागताचा सोहळा आटोपल्यानंतर नगर प्रदक्षिणा करून पालखी विसावा स्थळी प्रस्थान करेल.

फलटणमधल्या शाही स्वागताबद्दल एकंदरच वारकर्‍यांमध्ये आणि फलटणकरांमध्ये ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखी सोहळ्याची उत्सूकता असते. वर्षानुवर्षे फलटणच्या मुधोजी मनमोहन राजवाड्यासमोर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं जंगी स्वागत होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 3, 2011 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close