S M L

मारियाला सिनेमात घेऊ नका रामगोपाल वर्मांना मनसेचा इशारा

विनोद तळेकर, मुंबई 04 जुलैमारिया सुसाईराज प्रकरणावरून सेना - मनसे आमनेसामने आले आहेत. शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष एकमेकांचे जरी पक्के हाडवैरी असले तरी अनेक मुद्दयावर ते एकच भूमिका घेतात. ही बाब वारंवार दिसून आली. मारिया सुसाईराजला विरोध करायला पुन्हा एकदा हे दोन पक्ष पुढे सरसावले.नीरज ग्रोव्हर हत्याकांडातील आरोपी मारिया सुसाईराज हिची दोन दिवसांपूर्वी सुटका झाली. त्यानंतर लगेचच मारियाला आपल्या चित्रपटात काम देण्याबाबत आपण विचार करतोय अशी घोषणा बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी केली. रामू यांच्या या घोषणेमुळे मारिया हिंदी चित्रपटात झळकणार अशी चिन्ह दिसू लागली. पण मनसेने लगेचच त्यांच्या या मनसुब्यांवर पाणी फिरवलं. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणतात, जर कुणी मारियाला आपल्या सिनेमात, टीव्ही सिरियल्समध्ये किंवा रियालिटी शोमध्ये काम देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गय केली जाणार नाही. त्यांचे प्रयत्न हाणून पाडू आणि कोणत्याही कंपनीची स्पॉन्सरशिप घेतलेल्या ब्रँड्सची उत्पादन विकू देणार नाही.मनसेच्या या भुमिकेचीच री ओढत मग शिवसेनेच्या भारतीय चित्रपट सेनेनेसुद्धा मारियाला आपला विरोध असल्याचं जाहीर केलं. भारतीय चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिजीत पानसे म्हणतात, आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसमोर काय आदर्श ठेवतोय, याचे भान बाळगण्याची गरज आहे.आता शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी मारियावर घातलेल्या स्वयंघोषित बंदीमुळे मारियाला मुंबईत काम मिळण्याची शक्यता तशी कमीच दिसतेय. पण इतरही अनेक कलाकारांवर गुन्हे सिद्ध झाले. अनेकांना शिक्षाही झालीय त्याबाबत हे दोन पक्ष काय भूमिका घेणार हा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2011 11:22 AM IST

मारियाला सिनेमात घेऊ नका रामगोपाल वर्मांना मनसेचा इशारा

विनोद तळेकर, मुंबई

04 जुलै

मारिया सुसाईराज प्रकरणावरून सेना - मनसे आमनेसामने आले आहेत. शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष एकमेकांचे जरी पक्के हाडवैरी असले तरी अनेक मुद्दयावर ते एकच भूमिका घेतात. ही बाब वारंवार दिसून आली. मारिया सुसाईराजला विरोध करायला पुन्हा एकदा हे दोन पक्ष पुढे सरसावले.

नीरज ग्रोव्हर हत्याकांडातील आरोपी मारिया सुसाईराज हिची दोन दिवसांपूर्वी सुटका झाली. त्यानंतर लगेचच मारियाला आपल्या चित्रपटात काम देण्याबाबत आपण विचार करतोय अशी घोषणा बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांनी केली. रामू यांच्या या घोषणेमुळे मारिया हिंदी चित्रपटात झळकणार अशी चिन्ह दिसू लागली. पण मनसेने लगेचच त्यांच्या या मनसुब्यांवर पाणी फिरवलं.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणतात, जर कुणी मारियाला आपल्या सिनेमात, टीव्ही सिरियल्समध्ये किंवा रियालिटी शोमध्ये काम देण्याचा प्रयत्न केला तर त्यांची गय केली जाणार नाही. त्यांचे प्रयत्न हाणून पाडू आणि कोणत्याही कंपनीची स्पॉन्सरशिप घेतलेल्या ब्रँड्सची उत्पादन विकू देणार नाही.

मनसेच्या या भुमिकेचीच री ओढत मग शिवसेनेच्या भारतीय चित्रपट सेनेनेसुद्धा मारियाला आपला विरोध असल्याचं जाहीर केलं.

भारतीय चित्रपट सेनेचे अध्यक्ष अभिजीत पानसे म्हणतात, आपण आपल्या पुढच्या पिढ्यांसमोर काय आदर्श ठेवतोय, याचे भान बाळगण्याची गरज आहे.

आता शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी मारियावर घातलेल्या स्वयंघोषित बंदीमुळे मारियाला मुंबईत काम मिळण्याची शक्यता तशी कमीच दिसतेय. पण इतरही अनेक कलाकारांवर गुन्हे सिद्ध झाले. अनेकांना शिक्षाही झालीय त्याबाबत हे दोन पक्ष काय भूमिका घेणार हा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2011 11:22 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close