S M L

नागपूरच्या नाग नदीचा सांडपाण्याने झाला नाला

अखिलेश गणवीर, नागपूर 04 जुलैज्या नाग नदीवरून शहराचे नाव नागपूर पडले. त्या नाग नदीचा आता नाला झाला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता महापालिकेने या नदीचे शुद्धीकरण करण्याचे ठरवलं आहे. मात्र हा प्रकल्प कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहेत.नागपूर शहरातून वाहणार्‍या नाग नदीचा प्रवाह 20 किमी लांब आहे. पण सगळ्याच भागात या नदीत सांडपाणी आणि मलवाहिन्या सोडण्यात आल्या आहेत. नदीच्या काठावर राहणार्‍या नागरिकांना त्यामुळे आरोग्याचा धोका असतो. पावसाळ्याच्या दिवसात तर परिस्थिती आणखीनच वाईट असते.महापालिकेने या नदीचं शुध्दीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला. हा प्रस्ताव दोन महिन्याआधीच तयार केला. केंद्र सरकारच्या जेएनयूआरएम प्रकल्पातून निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.एकशे दहा कोटी रुपये खर्च येणार्‍या या प्रकल्पाला केंद्र सरकारने अजूनही मंजुरी दिली नाही. त्यामुळे महापालिकेचा हा प्रस्तावआजही थंड बस्त्यात आहे. या नदीचे चित्र कधी बदलेल आणि आरोग्याचा प्रश्न कधी सुटेल. याची नागपूरकर वाट पाहत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 4, 2011 04:05 PM IST

नागपूरच्या नाग नदीचा सांडपाण्याने झाला नाला

अखिलेश गणवीर, नागपूर

04 जुलै

ज्या नाग नदीवरून शहराचे नाव नागपूर पडले. त्या नाग नदीचा आता नाला झाला. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता महापालिकेने या नदीचे शुद्धीकरण करण्याचे ठरवलं आहे. मात्र हा प्रकल्प कधी पूर्ण होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहेत.

नागपूर शहरातून वाहणार्‍या नाग नदीचा प्रवाह 20 किमी लांब आहे. पण सगळ्याच भागात या नदीत सांडपाणी आणि मलवाहिन्या सोडण्यात आल्या आहेत. नदीच्या काठावर राहणार्‍या नागरिकांना त्यामुळे आरोग्याचा धोका असतो. पावसाळ्याच्या दिवसात तर परिस्थिती आणखीनच वाईट असते.

महापालिकेने या नदीचं शुध्दीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला. हा प्रस्ताव दोन महिन्याआधीच तयार केला. केंद्र सरकारच्या जेएनयूआरएम प्रकल्पातून निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

एकशे दहा कोटी रुपये खर्च येणार्‍या या प्रकल्पाला केंद्र सरकारने अजूनही मंजुरी दिली नाही. त्यामुळे महापालिकेचा हा प्रस्तावआजही थंड बस्त्यात आहे. या नदीचे चित्र कधी बदलेल आणि आरोग्याचा प्रश्न कधी सुटेल. याची नागपूरकर वाट पाहत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 4, 2011 04:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close