S M L

डोपिंग प्रकरणी प्रशिक्षकाची हकालपट्टी

05 जुलैडोपिंग प्रकरणात आत्तापर्यंत भारताचे एकूण 8 ऍथलिट दोषी आढळले आहे. त्यामुळे आता क्रीडा मंत्रालयाने यात कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ही राष्ट्रासाठी शरमेची बाब असून यासंदर्भात काही ठोस निर्णय घ्यावे लागणार असल्याचे क्रीडा मंत्री अजय माकन यांनी सांगितले. यात खेळाडूंबरोबर जे प्रशिक्षक आणि अधिकारी यात दोषी आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. यातच युक्रेनचे प्रशिक्षक युरी डिनिक यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायलयीन चौकशी होणार असून हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश याची चौकशी करणार आहे. मनदीप कौर, जुआना मुर्मु, अश्विनी अकुंज या तीन खेळाडू डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 11:52 AM IST

डोपिंग प्रकरणी प्रशिक्षकाची हकालपट्टी

05 जुलै

डोपिंग प्रकरणात आत्तापर्यंत भारताचे एकूण 8 ऍथलिट दोषी आढळले आहे. त्यामुळे आता क्रीडा मंत्रालयाने यात कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ही राष्ट्रासाठी शरमेची बाब असून यासंदर्भात काही ठोस निर्णय घ्यावे लागणार असल्याचे क्रीडा मंत्री अजय माकन यांनी सांगितले. यात खेळाडूंबरोबर जे प्रशिक्षक आणि अधिकारी यात दोषी आहेत त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.

यातच युक्रेनचे प्रशिक्षक युरी डिनिक यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. याप्रकरणी न्यायलयीन चौकशी होणार असून हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश याची चौकशी करणार आहे. मनदीप कौर, जुआना मुर्मु, अश्विनी अकुंज या तीन खेळाडू डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 11:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close