S M L

मारियाला चित्रपटात नो एन्ट्रीसाठी भायुमोची निदर्शन

05 जुलैनीरज ग्रोव्हर हत्येप्रकरणी 3 वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आलेली मारिया सुसायराज हिला आपल्या चित्रपटात घेण्याची तयारी रामगोपाल वर्मा यांनी दाखवली होती. या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील राम गोपाल वर्मा यांच्या कार्यालयापुढे निदर्शनं केली. तसंच त्यांना याविषयी पत्रही दिलं. पण आता रामगोपाल वर्मा यांनी भाजप युवा मोर्चाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीय. नीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणी दोषी ठरवलेल्या मारिया सुसाईराजला सिनेमात घ्यायला आपली हरकत नसल्याचं वर्मा यांनी ट्विटरवर लिहिलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 10:55 AM IST

मारियाला चित्रपटात नो एन्ट्रीसाठी भायुमोची निदर्शन

05 जुलै

नीरज ग्रोव्हर हत्येप्रकरणी 3 वर्षाची शिक्षा भोगून बाहेर आलेली मारिया सुसायराज हिला आपल्या चित्रपटात घेण्याची तयारी रामगोपाल वर्मा यांनी दाखवली होती. या विरोधात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथील राम गोपाल वर्मा यांच्या कार्यालयापुढे निदर्शनं केली.

तसंच त्यांना याविषयी पत्रही दिलं. पण आता रामगोपाल वर्मा यांनी भाजप युवा मोर्चाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केलीय. नीरज ग्रोव्हर हत्याप्रकरणी दोषी ठरवलेल्या मारिया सुसाईराजला सिनेमात घ्यायला आपली हरकत नसल्याचं वर्मा यांनी ट्विटरवर लिहिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 10:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close