S M L

माऊलींच्या पालखीचा आज सोलापूरमध्ये प्रवेश

05 जुलैज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज सोलापूर जिल्ह्यात धर्मापुरी या गावातून प्रवेश केला. यावेळी फुलांची सलामी देऊन पालखीचे स्वागत करण्यात आलं. आजच्या पालखीचा मुक्काम नातेपुते इथे असणार आहे. त्यानंतर उद्या होणार्‍या पहिल्या गोल रिंगणाकडे वारकर्‍यांचे लक्ष लागलं आहेत. उद्या सदाशिवनगरला पहिलं गोल रिंगण रंगेल. यापूर्वीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा निंब इथे झालं होतं. वारकर्‍यांनी टाळ मृदुंगाचा गजर करत आणि माऊली माऊलीच्या जयघोषात आता धर्मापुरीहून नातेपुतेच्या दिशेने प्रस्थान केलं आहे. सातारा जिल्हयाची हद्द संपून सोलापूरची हद्द सुरु झाल्याने दोन्ही प्रशासनाचे अधिकारी हजर होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 5, 2011 10:58 AM IST

माऊलींच्या पालखीचा आज सोलापूरमध्ये प्रवेश

05 जुलै

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज सोलापूर जिल्ह्यात धर्मापुरी या गावातून प्रवेश केला. यावेळी फुलांची सलामी देऊन पालखीचे स्वागत करण्यात आलं. आजच्या पालखीचा मुक्काम नातेपुते इथे असणार आहे. त्यानंतर उद्या होणार्‍या पहिल्या गोल रिंगणाकडे वारकर्‍यांचे लक्ष लागलं आहेत.

उद्या सदाशिवनगरला पहिलं गोल रिंगण रंगेल. यापूर्वीचं पहिलं उभं रिंगण चांदोबाचा निंब इथे झालं होतं. वारकर्‍यांनी टाळ मृदुंगाचा गजर करत आणि माऊली माऊलीच्या जयघोषात आता धर्मापुरीहून नातेपुतेच्या दिशेने प्रस्थान केलं आहे. सातारा जिल्हयाची हद्द संपून सोलापूरची हद्द सुरु झाल्याने दोन्ही प्रशासनाचे अधिकारी हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 5, 2011 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close