S M L

सचिनची लाखमोलाची मदत

06 जुलैक्रिकेटच्या मैदानावर नेहमीच आदर्श ठरलेला सचिन मैदानाबाहेरही अगदी तसाच आहे. यावेळी त्याने मदत केलीय ती पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या तिरंदाजांना. इटलीमधील तुरीन इथं येत्या 10 जुलैपासून वर्ल्ड पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप होत आहे. आणि या स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारतीय पॅरा तिरंदाजी टीममध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्युटचे पाच जवान सहभागी होत आहेत. यापैकी एका ऍथलीटने स्पर्धेच्या तयारीसाठी आपलं घर गहाण ठेवलं तर दुसर्‍या एका खेळाडूने बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे स्पर्धा तयारीसाठी वापरले आहेत. या खेळाडूंना पॅरा ऑलिम्पिक संघटना किंवा भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. अशा स्थितीत अमोल बोरिवले या खेळाडूला मात्र सचिनने मदतीचा हात पुढे केला आहे. सचिनने त्याला 3 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 6, 2011 03:40 PM IST

सचिनची लाखमोलाची मदत

06 जुलै

क्रिकेटच्या मैदानावर नेहमीच आदर्श ठरलेला सचिन मैदानाबाहेरही अगदी तसाच आहे. यावेळी त्याने मदत केलीय ती पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होणार्‍या तिरंदाजांना. इटलीमधील तुरीन इथं येत्या 10 जुलैपासून वर्ल्ड पॅरा आर्चरी चॅम्पियनशिप होत आहे. आणि या स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारतीय पॅरा तिरंदाजी टीममध्ये आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्युटचे पाच जवान सहभागी होत आहेत.

यापैकी एका ऍथलीटने स्पर्धेच्या तयारीसाठी आपलं घर गहाण ठेवलं तर दुसर्‍या एका खेळाडूने बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेले पैसे स्पर्धा तयारीसाठी वापरले आहेत. या खेळाडूंना पॅरा ऑलिम्पिक संघटना किंवा भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. अशा स्थितीत अमोल बोरिवले या खेळाडूला मात्र सचिनने मदतीचा हात पुढे केला आहे. सचिनने त्याला 3 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 6, 2011 03:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close