S M L

कधीच दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढत नाही - राज ठाकरे

07 जुलैअजित पवार यांच्या सल्ल्याची मला गरज नाही. दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी आमचे खांदे भक्कम आहे. अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरुच आहेत. शिवाय अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढण्याचा प्रश्नच नाही. आपण कधीच दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढत नाही असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या आव्हानाला अजित पवारांनी मनसेच्या आमदारांनीच ही प्रकरणं बाहेर काढावीत असं आव्हान दिलं होतं. त्यावर राज ठाकरेंनी अजित पवारांना चोख उत्तर दिलं. मनसेच्या आमदारांनी माझ्या विरोधात पुरावे असतील तर सादर करावी उगाच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विधान करू नये त्यापेक्षा मनसेच्या आमदारांनी आपल्या विरोधात काही पुरावे असतील ते सादर करावे माझा त्याला कोणताही विरोध नसणार आहे असं प्रतिआव्हान अजित पवार यांनी आज राज ठाकरे यांना दिले होते. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांना प्रतिटोला लगावला. अजित पवारांच्या खात्यातील प्रकरण बाहेर काढण्यासाठी मनसे आमदार काम करत आहेत. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात जो लढा सुरू केला आहे त्याला आपला पाठिंबा आहे. अण्णा सारख्याव्यक्तींनी महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करावा अशी आपली आग्रहाची मागणी आहे. लवकरच अण्णा हजारे यांची आपण भेट घेणार आहोत. अण्णा हे महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तीमत्व आहेत म्हणूनच त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची मी इच्छा व्यक्त केली होती असं राज ठाकरे स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2011 11:32 AM IST

कधीच दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढत नाही - राज ठाकरे

07 जुलै

अजित पवार यांच्या सल्ल्याची मला गरज नाही. दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यासाठी आमचे खांदे भक्कम आहे. अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरुच आहेत. शिवाय अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढण्याचा प्रश्नच नाही.

आपण कधीच दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढत नाही असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांच्या आव्हानाला अजित पवारांनी मनसेच्या आमदारांनीच ही प्रकरणं बाहेर काढावीत असं आव्हान दिलं होतं. त्यावर राज ठाकरेंनी अजित पवारांना चोख उत्तर दिलं.

मनसेच्या आमदारांनी माझ्या विरोधात पुरावे असतील तर सादर करावी उगाच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विधान करू नये त्यापेक्षा मनसेच्या आमदारांनी आपल्या विरोधात काही पुरावे असतील ते सादर करावे माझा त्याला कोणताही विरोध नसणार आहे असं प्रतिआव्हान अजित पवार यांनी आज राज ठाकरे यांना दिले होते.

यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवारांना प्रतिटोला लगावला. अजित पवारांच्या खात्यातील प्रकरण बाहेर काढण्यासाठी मनसे आमदार काम करत आहेत. अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात जो लढा सुरू केला आहे त्याला आपला पाठिंबा आहे.

अण्णा सारख्याव्यक्तींनी महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करावा अशी आपली आग्रहाची मागणी आहे. लवकरच अण्णा हजारे यांची आपण भेट घेणार आहोत. अण्णा हे महाराष्ट्रातील आदरणीय व्यक्तीमत्व आहेत म्हणूनच त्यांच्या पाठिशी उभे राहण्याची मी इच्छा व्यक्त केली होती असं राज ठाकरे स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2011 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close