S M L

मद्यधुंद पोलिसाने चिमुरडीला चिरडले

07 जुलैमद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणार्‍या एका एपीआय दर्जाच्या अधिकार्‍यांने चिरडल्यामुळे एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेत या चिमुरडीचे आई-वडिल ही या अपघात जखमी झाल्यामुळे कोमात आहेत. काल संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली.शुभ्रता गायकर असं या चिमुरडीचं नाव आहे. दुर्देवाची बाब म्हणजे शुभ्रता हीचा काल वाढदिवस होता. फोटो काढण्यासाठी आई वडिलांसोबत शिवाजी नगरातील दत्तमंदिर येथे गेले होते परत येत असताना मागून येणार्‍या कारने जोराची धडक दिली. नशेत तर्र असलेल्या पोलीस निरीक्षक वसंत लक्ष्मण पवार बेधुंदपणे गाडी चालवत होता. त्यांच्या गाडीने जोरदार धडक दिल्याने शुभ्रताचे आई वडिल रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. तर शुभ्रतासह कार विद्युत खांबाला जाऊन आदळली. त्यात ती गंभीर जखमी झाली. तातडीने तिला जवळच्या बिर्ला रूग्णालयात नेण्यात आले. पण प्रकृती चिंताजनक असल्यामुळे नाशिकला खाजगी रुग्णालयात नेण्यात येत असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी संतप्त नागरिकांनी काल रात्री दगडफेक केली. पोलिसाने दारुच्या नशेत गाडीखाली चिरडल्यानंतर वसंत पवार नावाच्या या अधिकार्‍याला मात्र अजूनही नाशिक पोलिसांकडून अभय मिळतं आहे. या अधिकार्‍याची सध्या 15 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2011 02:52 PM IST

मद्यधुंद पोलिसाने चिमुरडीला चिरडले

07 जुलै

मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणार्‍या एका एपीआय दर्जाच्या अधिकार्‍यांने चिरडल्यामुळे एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेत या चिमुरडीचे आई-वडिल ही या अपघात जखमी झाल्यामुळे कोमात आहेत. काल संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडली.

शुभ्रता गायकर असं या चिमुरडीचं नाव आहे. दुर्देवाची बाब म्हणजे शुभ्रता हीचा काल वाढदिवस होता. फोटो काढण्यासाठी आई वडिलांसोबत शिवाजी नगरातील दत्तमंदिर येथे गेले होते परत येत असताना मागून येणार्‍या कारने जोराची धडक दिली. नशेत तर्र असलेल्या पोलीस निरीक्षक वसंत लक्ष्मण पवार बेधुंदपणे गाडी चालवत होता.

त्यांच्या गाडीने जोरदार धडक दिल्याने शुभ्रताचे आई वडिल रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. तर शुभ्रतासह कार विद्युत खांबाला जाऊन आदळली. त्यात ती गंभीर जखमी झाली. तातडीने तिला जवळच्या बिर्ला रूग्णालयात नेण्यात आले. पण प्रकृती चिंताजनक असल्यामुळे नाशिकला खाजगी रुग्णालयात नेण्यात येत असताना तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी संतप्त नागरिकांनी काल रात्री दगडफेक केली. पोलिसाने दारुच्या नशेत गाडीखाली चिरडल्यानंतर वसंत पवार नावाच्या या अधिकार्‍याला मात्र अजूनही नाशिक पोलिसांकडून अभय मिळतं आहे. या अधिकार्‍याची सध्या 15 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2011 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close