S M L

आता लालबागचा राजा © कॉपीराईट होणार

07 जुलैकरोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे मूर्तीकार संतोष कांबळी यांनी कॉपीराईट हक्कासाठी अर्ज केला आहे. या कॉपीराईट हक्कासाठी त्यांना कला संरक्षण कायद्यांतर्गत अधिकृत डायरी नंबरही आज देण्यात आला. कॉपीराईटचे सर्व सोपस्कर पुढच्या सात ते आठ महिन्यात पूर्ण होतील. त्यामुळे यापुढे लालबागच्या राज्याच्या मूर्तीसारखी हूबेहुब मूर्ती दुसर्‍या मूर्तीकारांना बनवता येणार नाही. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी लालबागच्या राज्याची प्रतिकृती स्थापण्यात येते. मात्र आता दुसर्‍या कुठच्याही मूर्तीकाराला हुबेहुब प्रतिकृती साकारता येणार नाही. कॉपीराईटचे हक्क मूर्तीकाराकडे राहणार आहेत

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2011 04:36 PM IST

आता लालबागचा राजा © कॉपीराईट होणार

07 जुलै

करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे मूर्तीकार संतोष कांबळी यांनी कॉपीराईट हक्कासाठी अर्ज केला आहे. या कॉपीराईट हक्कासाठी त्यांना कला संरक्षण कायद्यांतर्गत अधिकृत डायरी नंबरही आज देण्यात आला. कॉपीराईटचे सर्व सोपस्कर पुढच्या सात ते आठ महिन्यात पूर्ण होतील.

त्यामुळे यापुढे लालबागच्या राज्याच्या मूर्तीसारखी हूबेहुब मूर्ती दुसर्‍या मूर्तीकारांना बनवता येणार नाही. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी लालबागच्या राज्याची प्रतिकृती स्थापण्यात येते. मात्र आता दुसर्‍या कुठच्याही मूर्तीकाराला हुबेहुब प्रतिकृती साकारता येणार नाही. कॉपीराईटचे हक्क मूर्तीकाराकडे राहणार आहेत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2011 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close