S M L

तमाशा कलावंत लहू खाडे यांचे निधन

07 जुलैप्रसिद्ध तमाशा कलावंत लहू संभाजी खाडे अर्थात काळू-बाळू तमाशातील काळू यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. सांगली इथल्या कवलापूर या गावात त्यांचे निधन झाले.संभाजी खाडे प्रसिद्ध 'काळूबाळू तमाशा'चे मालक होते. ग्रामीण भागात तमाशा सारख्या कलेचा प्रसार त्यांनी केला होता. तमाशाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं काम त्यांनी केलं आहेत. गेली 50 वर्षे त्यांनी तमाशाच्या माध्यमातून आपली कला सादर केली. या क्षेत्रात त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे. काळू-बाळू या जुळ्या बंधूंनी एकाच वेळी संवाद उच्चारण्याची कला अवगत केली होती. त्यांचा जहरी प्याला अर्थात काळू बाळू हे वगनाट्य संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2011 06:00 PM IST

तमाशा कलावंत लहू खाडे यांचे निधन

07 जुलै

प्रसिद्ध तमाशा कलावंत लहू संभाजी खाडे अर्थात काळू-बाळू तमाशातील काळू यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. सांगली इथल्या कवलापूर या गावात त्यांचे निधन झाले.संभाजी खाडे प्रसिद्ध 'काळूबाळू तमाशा'चे मालक होते. ग्रामीण भागात तमाशा सारख्या कलेचा प्रसार त्यांनी केला होता. तमाशाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचं काम त्यांनी केलं आहेत. गेली 50 वर्षे त्यांनी तमाशाच्या माध्यमातून आपली कला सादर केली. या क्षेत्रात त्यांची चौथी पिढी कार्यरत आहे. काळू-बाळू या जुळ्या बंधूंनी एकाच वेळी संवाद उच्चारण्याची कला अवगत केली होती. त्यांचा जहरी प्याला अर्थात काळू बाळू हे वगनाट्य संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2011 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close