S M L

दरोडेखोरांचा धुमाकूळ ; 2 मुलींवर बलात्कार

09 जुलैअहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एकाच घरावर दरोडेखोरांनी महिलांना विवस्त्र करून मारहाण केली. तसेच घरातील दोन तरूणीवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील वीरगाव येथील टेमेगिरे येथे ही घटना घडली. या घटनेमुळे भागात एकच खळबळ उडाली. जखमी महिलांना स्थानी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर दोन वयोवृध्द महिलांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अहमदनगरमध्ये मागील काही दिवसांपासून दरोडेखोरांचा धुमाकूळ घातला आहे. या घटनांना आळा बसत नाही तोच काल मध्यरात्री 2:30 वाजता माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. दशक्रिया विधीसाठी घरी नातेवाईक जमले होते. घरी कोणतही पुरूष मंडळी घरी नसल्याचे साधून दरोडेखोरांनी चाकू, कुर्‍हाडीचा धाक दाखवून घरात घुसले. या नराधामांनी महिलांना विवस्त्र करून बेदम मारहाण केली आणि त्यांच्यासमोर दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला. हा क्रूरपणा पाहून घाभरलेल्या महिलांना आरडाओरडा करता आला नाही. दरोडेखोरांनी या महिलांच्या अंगावरील दागिने, आणि रोख दहा हजार रूपये लुटले. आज पहाटे हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोर हे हिंदी भाषिक असल्याची माहितासमोर येत आहे. यावरून पोलिसांच्या दरोडेखोर हे बाहेरील राज्यातील असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरोडेखोरांच्या तपासासाठी दोन पथक तातडीने शोधमोहिमेसाठी रवाना करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2011 08:30 AM IST

दरोडेखोरांचा धुमाकूळ ; 2 मुलींवर बलात्कार

09 जुलै

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात एकाच घरावर दरोडेखोरांनी महिलांना विवस्त्र करून मारहाण केली. तसेच घरातील दोन तरूणीवर बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील वीरगाव येथील टेमेगिरे येथे ही घटना घडली. या घटनेमुळे भागात एकच खळबळ उडाली. जखमी महिलांना स्थानी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे तर दोन वयोवृध्द महिलांना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

अहमदनगरमध्ये मागील काही दिवसांपासून दरोडेखोरांचा धुमाकूळ घातला आहे. या घटनांना आळा बसत नाही तोच काल मध्यरात्री 2:30 वाजता माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. दशक्रिया विधीसाठी घरी नातेवाईक जमले होते. घरी कोणतही पुरूष मंडळी घरी नसल्याचे साधून दरोडेखोरांनी चाकू, कुर्‍हाडीचा धाक दाखवून घरात घुसले. या नराधामांनी महिलांना विवस्त्र करून बेदम मारहाण केली आणि त्यांच्यासमोर दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला. हा क्रूरपणा पाहून घाभरलेल्या महिलांना आरडाओरडा करता आला नाही. दरोडेखोरांनी या महिलांच्या अंगावरील दागिने, आणि रोख दहा हजार रूपये लुटले.

आज पहाटे हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरोडेखोर हे हिंदी भाषिक असल्याची माहितासमोर येत आहे. यावरून पोलिसांच्या दरोडेखोर हे बाहेरील राज्यातील असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. दरोडेखोरांच्या तपासासाठी दोन पथक तातडीने शोधमोहिमेसाठी रवाना करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2011 08:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close