S M L

अभिनेत्री रसिका जोशी यांचे निधन

07 जुलैहसा चकटफू मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या कसदार अभिनेत्री रसिका जोशी यांचे कर्क रोगाने निधन झालं. आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर छाप टाकली. विनोदी भूमिकांसाठी रसिका जोशी परिचित होत्या. त्यांचे व्हाईट लिली नाईट रायडर, नागमंडळ, हलकंफुलकंसारखी अनेक नाटकं गाजली आणि कसदार अभिनयाने प्रेक्षकच नाही तर समीक्षकांचीही वाहवा मिळवली. अनेक मराठी मालिकांतून रसिका जोशी घरोघरी पोहचल्या होत्या. तसेच मराठी चित्रपट सृष्टीसह बॉलीवूड सृष्टीमध्ये ही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. भुलभुलैया, गायब, वास्तुशास्त्र, जॉनी गद्दार,मालामाल विकली अशा अनेक हिंदी सिनेमातील भूमिकाही गाजल्या. तसेच त्यांनी यंदा कर्तव्य या सिनेमांसाठी पटकथा लेखन ही केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 7, 2011 06:24 PM IST

अभिनेत्री रसिका जोशी यांचे निधन

07 जुलै

हसा चकटफू मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या कसदार अभिनेत्री रसिका जोशी यांचे कर्क रोगाने निधन झालं. आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनावर छाप टाकली. विनोदी भूमिकांसाठी रसिका जोशी परिचित होत्या. त्यांचे व्हाईट लिली नाईट रायडर, नागमंडळ, हलकंफुलकंसारखी अनेक नाटकं गाजली आणि कसदार अभिनयाने प्रेक्षकच नाही तर समीक्षकांचीही वाहवा मिळवली.

अनेक मराठी मालिकांतून रसिका जोशी घरोघरी पोहचल्या होत्या. तसेच मराठी चित्रपट सृष्टीसह बॉलीवूड सृष्टीमध्ये ही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. भुलभुलैया, गायब, वास्तुशास्त्र, जॉनी गद्दार,मालामाल विकली अशा अनेक हिंदी सिनेमातील भूमिकाही गाजल्या. तसेच त्यांनी यंदा कर्तव्य या सिनेमांसाठी पटकथा लेखन ही केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 7, 2011 06:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close