S M L

पिंपरी-चिंचवड पालिकेचे आपल्याच कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड, पुणे09 जुलैपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराच आणखी एक उदाहरण समोर आलं. महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयाचे आरोग्य आणि अस्तित्व दोन्ही धोक्यात आलं आहे. महापालिकेकडून देण्यात आलेल्या ज्या वसाहतींमध्ये हे कर्मचारी राहतात त्या वसाहतीमध्ये घाणीच साम्राज्य पसरले आहेत. तर वसाहतीतील सर्व इमारती मोडकळीस आल्या आहेत. पण महापालिका मात्र ह्या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.पी.सी.एम.सी. कॉलनीत सांडपाण्याच्या निचर्‍याची सोय नाही त्यामुळे नाले तुंबले आहेत. कचरा अनेक दिवस उचलला जात नसल्यामुळे कच-याचे ढिग साचले. यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे वसाहतीतील इमारतीची अवस्थाही वाईट आहे. जिन्यांचे कठडेही तुटले आहेत. या जिन्याचा वापर करायचा म्हणजे जीवघेणी कसरतच करावी लागत आहेत. पाणी आणि वीजेची टंचाई अशा समस्या तर आहेच.महापालिकेचं तर या वसाहतीतल्या समस्यांकडे अजिबातच लक्ष नाही आणि त्यामुळेच या वसाहतीत घुसखोरीसुध्दा वाढलेली आहे.महत्त्वाचे म्हणजे, ही वसाहत उभी आहे अत्यंत मोक्याच्या जागी. काही बिल्डरांची या भूखंडावर नजर आहे आणि हा भूखंड बिल्डरांना लाटता यावा यासाठीच महापालिका वसाहतीच्या समस्येकडे दुर्लक्ष करतेय असा विरोधकांनी आरोप केला आहे. महापालिका या वसाहतीतल्या कर्मचार्‍यांचे पुनर्वसन करणार आहे असं आश्वासन उपमहापौर देत आहे. पण त्याचबरोबर वसाहतीत राहणा-या नागरिकांनीच स्वच्छता पाळावी असा सल्लाही त्यांनी देऊन टाकला. यावर कडी म्हणजे या उपमहापौर महाशयांनी अस्वच्छतेची सगळी जबाबदारी ढकलली ती ठेकेदारावर.पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्वेसर्वा म्हणजे अजित पवार, जे नागरिकांच्या समस्यांवर मोठमोठी भाषणं तर देतात. नागरिक राहू देत पण दादांना महापालिका कर्मचारीच किती हलाखीत राहतायत हे अजूनतरी दिसलेलं नाही. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी झटणारे हे कर्मचारी प्रशासनाला कळकळीचे आवाहन करतायत की लवकरात लवकर आमची या घाणीच्या साम्राज्यातून सुटका करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2011 10:16 AM IST

पिंपरी-चिंचवड पालिकेचे आपल्याच कर्मचार्‍यांकडे दुर्लक्ष

गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड, पुणे

09 जुलै

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराच आणखी एक उदाहरण समोर आलं. महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयाचे आरोग्य आणि अस्तित्व दोन्ही धोक्यात आलं आहे. महापालिकेकडून देण्यात आलेल्या ज्या वसाहतींमध्ये हे कर्मचारी राहतात त्या वसाहतीमध्ये घाणीच साम्राज्य पसरले आहेत. तर वसाहतीतील सर्व इमारती मोडकळीस आल्या आहेत. पण महापालिका मात्र ह्या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

पी.सी.एम.सी. कॉलनीत सांडपाण्याच्या निचर्‍याची सोय नाही त्यामुळे नाले तुंबले आहेत. कचरा अनेक दिवस उचलला जात नसल्यामुळे कच-याचे ढिग साचले. यामुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे वसाहतीतील इमारतीची अवस्थाही वाईट आहे. जिन्यांचे कठडेही तुटले आहेत. या जिन्याचा वापर करायचा म्हणजे जीवघेणी कसरतच करावी लागत आहेत. पाणी आणि वीजेची टंचाई अशा समस्या तर आहेच.

महापालिकेचं तर या वसाहतीतल्या समस्यांकडे अजिबातच लक्ष नाही आणि त्यामुळेच या वसाहतीत घुसखोरीसुध्दा वाढलेली आहे.महत्त्वाचे म्हणजे, ही वसाहत उभी आहे अत्यंत मोक्याच्या जागी. काही बिल्डरांची या भूखंडावर नजर आहे आणि हा भूखंड बिल्डरांना लाटता यावा यासाठीच महापालिका वसाहतीच्या समस्येकडे दुर्लक्ष करतेय असा विरोधकांनी आरोप केला आहे.

महापालिका या वसाहतीतल्या कर्मचार्‍यांचे पुनर्वसन करणार आहे असं आश्वासन उपमहापौर देत आहे. पण त्याचबरोबर वसाहतीत राहणा-या नागरिकांनीच स्वच्छता पाळावी असा सल्लाही त्यांनी देऊन टाकला. यावर कडी म्हणजे या उपमहापौर महाशयांनी अस्वच्छतेची सगळी जबाबदारी ढकलली ती ठेकेदारावर.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्वेसर्वा म्हणजे अजित पवार, जे नागरिकांच्या समस्यांवर मोठमोठी भाषणं तर देतात. नागरिक राहू देत पण दादांना महापालिका कर्मचारीच किती हलाखीत राहतायत हे अजूनतरी दिसलेलं नाही. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी झटणारे हे कर्मचारी प्रशासनाला कळकळीचे आवाहन करतायत की लवकरात लवकर आमची या घाणीच्या साम्राज्यातून सुटका करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2011 10:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close