S M L

सगळे नेते एकाच माळेचे मणी - अण्णा हजारे

09 जुलैअण्णा हजारे यांनी लोकपालचा विषय बाजूला ठेवून भुजबळ आणि पवार यांच्या खात्यातील प्रकरण बाहेर काढावी असे राज ठाकरे यांचे आवाहन अण्णांनी धुडकावून लावले. पवार असो वा राज ठाकरे हे सर्व एकाच माळेचे मणी आहे. याच्यावर चिखल फेका त्यांच्यावर चिखल फेका हे राजकीय नेत्यांनी न करण्यापेक्षा भ्रष्टाचाराला कसे संपवता येईल याचा विचार करावा असा सल्ला अण्णा हजारे यांनी राजकीय नेत्यांना दिला. अण्णा मुंबईत भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या कार्यलयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.नाशिक येथे पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राज ठाकरे यांनी भुजबळ आणि पवार यांच्या खात्यातील प्रकरण बाहेर काढावी अण्णांनी जर ही मोहीम हाती घेतली तर अण्णांच्या पाठिशी अख्खा महाराष्ट्र उभा करीन असे आवाहन राज ठाकरे यांनी दिले होते. राज यांचा आवाहनाचा समाचार घेत अजितदादांनी अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नये, आपले आमदार काय करत आहे आपल्या आमदारांना कामी लावा असा प्रतिहल्ला अजित पवार यांनी राज ठाकरेंवर केला होता. दोन राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोप आणि दिल्ली दरबारी लोकपाल बैठकीदरम्यान अण्णांना राजकीय नेत्यांचा आलेला अनुभव लक्षात ठेवून अण्णांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा चांगलाचा समाचार घेतला. सर्व नेते एकाच माळेचे मणी आहे. एकामेकांवर आरोप करण्यापेक्षा भ्रष्टाचाराला आळा कसा घालता येईल यांचा विचार करावा असा सल्ला अण्णांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 9, 2011 05:12 PM IST

सगळे नेते एकाच माळेचे मणी - अण्णा हजारे

09 जुलै

अण्णा हजारे यांनी लोकपालचा विषय बाजूला ठेवून भुजबळ आणि पवार यांच्या खात्यातील प्रकरण बाहेर काढावी असे राज ठाकरे यांचे आवाहन अण्णांनी धुडकावून लावले. पवार असो वा राज ठाकरे हे सर्व एकाच माळेचे मणी आहे. याच्यावर चिखल फेका त्यांच्यावर चिखल फेका हे राजकीय नेत्यांनी न करण्यापेक्षा भ्रष्टाचाराला कसे संपवता येईल याचा विचार करावा असा सल्ला अण्णा हजारे यांनी राजकीय नेत्यांना दिला. अण्णा मुंबईत भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या कार्यलयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

नाशिक येथे पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी राज ठाकरे यांनी भुजबळ आणि पवार यांच्या खात्यातील प्रकरण बाहेर काढावी अण्णांनी जर ही मोहीम हाती घेतली तर अण्णांच्या पाठिशी अख्खा महाराष्ट्र उभा करीन असे आवाहन राज ठाकरे यांनी दिले होते.

राज यांचा आवाहनाचा समाचार घेत अजितदादांनी अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवू नये, आपले आमदार काय करत आहे आपल्या आमदारांना कामी लावा असा प्रतिहल्ला अजित पवार यांनी राज ठाकरेंवर केला होता.

दोन राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोप आणि दिल्ली दरबारी लोकपाल बैठकीदरम्यान अण्णांना राजकीय नेत्यांचा आलेला अनुभव लक्षात ठेवून अण्णांनी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांचा चांगलाचा समाचार घेतला. सर्व नेते एकाच माळेचे मणी आहे. एकामेकांवर आरोप करण्यापेक्षा भ्रष्टाचाराला आळा कसा घालता येईल यांचा विचार करावा असा सल्ला अण्णांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 9, 2011 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close