S M L

2 जी प्रकरणात प्रमोद महाजनांचेही नाव !

10 जुलैस्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणाचा सीबीआय तपास भाजपचे दिवंगत नेते आणि माजी दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांच्यापर्यंत येवून ठेपला. महाजनांनीही स्पेक्ट्रम वाटतांना नियमांचा भंग करुन काही खाजगी कंपन्यांना फायदा पोहोचवल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तपासात पुढं आलं आहे. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार महाजन यांनी दूससंचार मंत्री म्हणून अतिरीक्त स्पेक्ट्रमच वाटप केलं होतं. फक्त 1 टक्के अतिरिक्त किंमतीत त्यांनी या अतिरिक्त स्पेक्ट्रमचे वाटप केले. या व्यवहारामुळे दूरसंचार मंत्रालयाला तब्ब्ल 565 कोटी रुपयांचा महसूल कमी मिळाले. म्हणजेच नुकसान झाले असं सीबीआयच्या तपासात पुढे आले आहेत. कंपनीची गुणवत्ता न बघताच स्पेक्ट्रम वाटप केल्याचंही सीबीआयचे म्हणणं आहे. अरुण शौरी, प्रमोद महाजन आणि दयानिधी मारन यांच्या कार्यकाळात म्हणजे 2001 ते 2007 या काळात झालेल्या स्पेक्ट्रम वाटपाची चौकशी सीबीआय करतं आहे. प्रमोद महाजन यांचे नाव समोर आल्यामुळे युपीए पाठोपाठ भाजपलाही आता आरोपीच्या पिंजर्‍यात उभं राहावं लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2011 09:53 AM IST

2 जी प्रकरणात प्रमोद महाजनांचेही नाव !

10 जुलै

स्पेक्ट्रम वाटप घोटाळा प्रकरणाचा सीबीआय तपास भाजपचे दिवंगत नेते आणि माजी दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांच्यापर्यंत येवून ठेपला. महाजनांनीही स्पेक्ट्रम वाटतांना नियमांचा भंग करुन काही खाजगी कंपन्यांना फायदा पोहोचवल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तपासात पुढं आलं आहे.

आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार महाजन यांनी दूससंचार मंत्री म्हणून अतिरीक्त स्पेक्ट्रमच वाटप केलं होतं. फक्त 1 टक्के अतिरिक्त किंमतीत त्यांनी या अतिरिक्त स्पेक्ट्रमचे वाटप केले. या व्यवहारामुळे दूरसंचार मंत्रालयाला तब्ब्ल 565 कोटी रुपयांचा महसूल कमी मिळाले.

म्हणजेच नुकसान झाले असं सीबीआयच्या तपासात पुढे आले आहेत. कंपनीची गुणवत्ता न बघताच स्पेक्ट्रम वाटप केल्याचंही सीबीआयचे म्हणणं आहे. अरुण शौरी, प्रमोद महाजन आणि दयानिधी मारन यांच्या कार्यकाळात म्हणजे 2001 ते 2007 या काळात झालेल्या स्पेक्ट्रम वाटपाची चौकशी सीबीआय करतं आहे. प्रमोद महाजन यांचे नाव समोर आल्यामुळे युपीए पाठोपाठ भाजपलाही आता आरोपीच्या पिंजर्‍यात उभं राहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2011 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close