S M L

महिलेकडून बँकेची दोन कोटींची फसवणूक

13 नोव्हेंबर, मुंबईअजित मांढरेमुंबईतल्या, कफपरेड भागातील, कपोल कोऑपरेटीव्ह बँकेमध्ये काम करणार्‍या एका महिलेनं बँकेची दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. तिने आपल्या लग्नाकरता ही फसवणूक केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं.30 वर्षांची मालती कफपरेड मधल्या कपोल को ऑपरेटिव्ह बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत होती. या बँकेत इलेक्ट्रॉनिक ट्रांझिशनद्वारा मालतीला एक करोड रुपयांचं ट्रांझिशन करण्याचे अधिकार बँकेकडून देण्यात आले होते, याच अधिकाराचा गैरवापर करून तिनं बँकेची दोन करोड रुपयांची फसवणूक केली. आपल्या प्रियकरासोबत पश्चिम बंगालच्या मध्यम ग्राम इथल्या एका बँकेत पाच बनावट खातं उघडली होती. त्या बँकेत मालतीनं इलेक्ट्रॉनिक ट्रांझिशनद्वारा पैसे जमा केले होते. मात्र मालतीच्या एका चुकीमुळं तिचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी मालतीला आणि साथीदारांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 13, 2008 12:59 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 13, 2008 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close