S M L

दरोडा प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी - मुंडे

10 जुलैअहमदनगरच्या अकोले तालुक्यातील वीरगावमध्ये झालेल्या दरोडे प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. घडलेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे दरोडेखोरांना याची शिक्षा मिळालीच पाहिजे असं मत ही गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलं. आज अकोले येथे अत्याचाराविरूध्द सर्वपक्षीय सभा घेऊन तीव्र निषेध करण्यात आला. नंतर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली. दरोडेखोरांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज, सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली. सकाळपासून अकोले शहरात कडकडीत बंद होता. रविवार असल्यामुळे शाळा, कॉलेज सुद्धा बंदच आहेत. दरम्यान पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी या दरोड्याचा तपास एन.अंबिका या महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवला. आरोपींचे धागेधोरे मिळाल्यामुळे दरोडेखोर लवकरच गजाआड होतील अशी माहिती कृष्ण प्रकाश यांनी दिली. दरम्यान अहमदनगर जिल्हात दरोड्यांचे सत्रं सुरुच आहे. काल रात्री अगस्ती मंदिरातून चोरट्यांनी 1 किलो चांदीच्या पादुका लंपास केल्या आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 10, 2011 03:47 PM IST

दरोडा प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी - मुंडे

10 जुलै

अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील वीरगावमध्ये झालेल्या दरोडे प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली आहे. घडलेली घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी आहे दरोडेखोरांना याची शिक्षा मिळालीच पाहिजे असं मत ही गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलं.

आज अकोले येथे अत्याचाराविरूध्द सर्वपक्षीय सभा घेऊन तीव्र निषेध करण्यात आला. नंतर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली. दरोडेखोरांनी केलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज, सर्वपक्षीय बंदची हाक देण्यात आली. सकाळपासून अकोले शहरात कडकडीत बंद होता.

रविवार असल्यामुळे शाळा, कॉलेज सुद्धा बंदच आहेत. दरम्यान पोलीस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांनी या दरोड्याचा तपास एन.अंबिका या महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवला. आरोपींचे धागेधोरे मिळाल्यामुळे दरोडेखोर लवकरच गजाआड होतील अशी माहिती कृष्ण प्रकाश यांनी दिली. दरम्यान अहमदनगर जिल्हात दरोड्यांचे सत्रं सुरुच आहे. काल रात्री अगस्ती मंदिरातून चोरट्यांनी 1 किलो चांदीच्या पादुका लंपास केल्या आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 10, 2011 03:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close