S M L

महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडं

11 जुलैआज आषाढी एकादशी.. पंढरपूरच्या वारी सोहळ्याचा आज कळस...अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिरात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहाटे विठ्ठलाची महापूजा झाली. पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री या नात्याने श्री विठ्ठलाची सपत्नीक महापूजा केली. त्यावेळी हरिनामाच्या जयघोषात विठठ्ल रुक्मिणी मंदिर दुमदुमून गेलं होतं. पहाटे 2.30 ते 3.00 च्या दरम्यान हा महापूजेचा सोहळा रंगला. शुद्ध जल आणि दुग्धाभिषेकाने विठ्ठलाची महापूजा पार पडली. त्यानंतर देवी रुक्मिणीची महापूजाही थाटात पार पडली. महाभिषेकानंतर रुक्मिणीला केशरी वस्त्राने नटवण्यात आलं होतं. त्याचबरोबर अलंकारांनीही सजवण्यात आलं. महापूजेच्या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, तसेच सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारीही हजर होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 11, 2011 09:48 AM IST

महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडं

11 जुलै

आज आषाढी एकादशी.. पंढरपूरच्या वारी सोहळ्याचा आज कळस...अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या विठ्ठल मंदिरात आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहाटे विठ्ठलाची महापूजा झाली. पृथ्वीराज चव्हाण यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री या नात्याने श्री विठ्ठलाची सपत्नीक महापूजा केली.

त्यावेळी हरिनामाच्या जयघोषात विठठ्ल रुक्मिणी मंदिर दुमदुमून गेलं होतं. पहाटे 2.30 ते 3.00 च्या दरम्यान हा महापूजेचा सोहळा रंगला. शुद्ध जल आणि दुग्धाभिषेकाने विठ्ठलाची महापूजा पार पडली. त्यानंतर देवी रुक्मिणीची महापूजाही थाटात पार पडली.

महाभिषेकानंतर रुक्मिणीला केशरी वस्त्राने नटवण्यात आलं होतं. त्याचबरोबर अलंकारांनीही सजवण्यात आलं. महापूजेच्या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, तसेच सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सोलापूरचे पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे आणि तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारीही हजर होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2011 09:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close