S M L

डोपिंगच्या दुसर्‍या टेस्टमध्ये अश्विनी आखुंजी दोषी

11 जुलैकॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावणारी अश्विनी आखुंजी डोपिंगच्या दुसर्‍या टेस्टमध्ये दोषी आढळली आहे. अश्विनीबरोबरचे ऍथलीट प्रियांका पवारही दोषी आढळली. त्यामुळे आता त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. आणि त्यांच्यावर आता प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिबंधीत स्टेरॉईड घेतल्याप्रकरणी या दोन्ही ऍथलीटवर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, डोपिंग टेस्ट प्रकरणी क्रीडा मंत्रालयाची कारवाई सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच साईच्या बंगळूरु इथंल्या केंद्रावर नाडाने आज छापा टाकला. या कारवाईत चार अधिकार्‍यांनी प्रत्येक रूमची तपासणी केली. तसेच औषधांची तपासणी केली. वेटलिफ्टींग टीम सध्या बंगलोर इथं सराव करत आहे. गेेल्या आठवड्यात डोपिंग प्रकरणी वेटलिफ्टींग आणि जिमनॅस्टीकच्या कोचना निलंबित करण्यात आलं होतं. पटियाला येथील एनएसआय मध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 11, 2011 11:09 AM IST

डोपिंगच्या दुसर्‍या टेस्टमध्ये अश्विनी आखुंजी दोषी

11 जुलै

कॉमनवेल्थ गेम्स आणि एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावणारी अश्विनी आखुंजी डोपिंगच्या दुसर्‍या टेस्टमध्ये दोषी आढळली आहे. अश्विनीबरोबरचे ऍथलीट प्रियांका पवारही दोषी आढळली. त्यामुळे आता त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. आणि त्यांच्यावर आता प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिबंधीत स्टेरॉईड घेतल्याप्रकरणी या दोन्ही ऍथलीटवर कारवाई करण्यात आली होती.

दरम्यान, डोपिंग टेस्ट प्रकरणी क्रीडा मंत्रालयाची कारवाई सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच साईच्या बंगळूरु इथंल्या केंद्रावर नाडाने आज छापा टाकला. या कारवाईत चार अधिकार्‍यांनी प्रत्येक रूमची तपासणी केली. तसेच औषधांची तपासणी केली. वेटलिफ्टींग टीम सध्या बंगलोर इथं सराव करत आहे. गेेल्या आठवड्यात डोपिंग प्रकरणी वेटलिफ्टींग आणि जिमनॅस्टीकच्या कोचना निलंबित करण्यात आलं होतं. पटियाला येथील एनएसआय मध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2011 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close