S M L

अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी निर्दोष - दिग्विजय सिंग

11 जुलैआदर्श सोसायटी प्रकरणात मुख्यमंत्रीपद गेलेले अशोक चव्हाण आणि कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी तिहार जेलमध्ये असणारे सुरेश कलमाडी निर्दोष आहेत आणि ते कोर्टातूनही निर्दोष सुटतील असं काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कलमाडी यांना जामीन द्यायला काय अडचण आहे असा सवालही त्यांनी केला. पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिग्विजय सिंग यांनी हे खळबळजनक विधान केलं. काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग नेहमी कोणत्या न कोणत्या विधानामुळे अडचणी ओढावून घेतात. आज पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना दिग्विजय सिंग म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या सारख्या नेत्याला मुख्यमंत्रीपदावरून हटावे लागले याच मला दु:ख आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आमच्या भावासारखे सुरेश कलमाडी यांना आज अडचणींना सामोर जावं लागतं आहे. मी व्यक्तीगत स्तरावर सांगू इच्छी तो की, अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी निर्दोष आहे. असं विधान दिग्विजय सिंग यांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 11, 2011 04:56 PM IST

अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी निर्दोष - दिग्विजय सिंग

11 जुलै

आदर्श सोसायटी प्रकरणात मुख्यमंत्रीपद गेलेले अशोक चव्हाण आणि कॉमनवेल्थ घोटाळ्या प्रकरणी तिहार जेलमध्ये असणारे सुरेश कलमाडी निर्दोष आहेत आणि ते कोर्टातूनही निर्दोष सुटतील असं काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कलमाडी यांना जामीन द्यायला काय अडचण आहे असा सवालही त्यांनी केला. पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दिग्विजय सिंग यांनी हे खळबळजनक विधान केलं.

काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग नेहमी कोणत्या न कोणत्या विधानामुळे अडचणी ओढावून घेतात. आज पुण्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना दिग्विजय सिंग म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्या सारख्या नेत्याला मुख्यमंत्रीपदावरून हटावे लागले याच मला दु:ख आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी आमच्या भावासारखे सुरेश कलमाडी यांना आज अडचणींना सामोर जावं लागतं आहे. मी व्यक्तीगत स्तरावर सांगू इच्छी तो की, अशोक चव्हाण आणि सुरेश कलमाडी निर्दोष आहे. असं विधान दिग्विजय सिंग यांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 11, 2011 04:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close