S M L

कासकर हल्ला प्रकरणी डी.के रावच्या कोठडीत वाढ

12 जुलैदाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणी छोटा राजनचा खास साथीदार डी के राव याला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. काल रात्री उशीरा मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. इक्बाल कासकर याच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणी डी के रावने शुटर्सला मदत केल्याचा आरोप आहे. 17 मे रोजी इक्बाल कासकर हा आपल्या पाकमोडीया स्ट्रीट येथे घराबाहेर आपल्या साथीदारांशी बातचीत करत होता. तेव्हा भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी स्वारांनी कासकरवर अंदाधूद गोळीबार केला. या गोळीबारात कासकरचा बॉडीगार्ड गंभीर जखमी झाला त्यांना रूग्नालयात नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला होता. या गोळीबार प्रकरणी छोटा राजनचा खास साथीदार डी के राव याला अटक करण्यात आली. आता त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2011 11:00 AM IST

कासकर हल्ला प्रकरणी डी.के रावच्या कोठडीत वाढ

12 जुलै

दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणी छोटा राजनचा खास साथीदार डी के राव याला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. काल रात्री उशीरा मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. इक्बाल कासकर याच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणी डी के रावने शुटर्सला मदत केल्याचा आरोप आहे.

17 मे रोजी इक्बाल कासकर हा आपल्या पाकमोडीया स्ट्रीट येथे घराबाहेर आपल्या साथीदारांशी बातचीत करत होता. तेव्हा भरधाव वेगाने आलेल्या दुचाकी स्वारांनी कासकरवर अंदाधूद गोळीबार केला. या गोळीबारात कासकरचा बॉडीगार्ड गंभीर जखमी झाला त्यांना रूग्नालयात नेत असतांना त्यांचा मृत्यू झाला होता. या गोळीबार प्रकरणी छोटा राजनचा खास साथीदार डी के राव याला अटक करण्यात आली. आता त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2011 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close