S M L

तहसीलदाराला मारहाणीमुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना फटका

12 जुलैमेडिकल ऍडमिशनसाठी स्क्रुटीनी फॉर्म सबमिट करण्याची आज शेवटची तारीख होती. पण वाडा तहसीलदार मारहाण प्रकरणामुळे तहसीलदार कार्यालयात आज कामबंद आंदोलन केलं होतं. त्याचा फटका शेकडो विद्यार्थ्यांना आणि पालकांना बसला. स्क्रुटीनी फॉर्म सोबत क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर करायचं होतं. पण तहसीलदार कार्यालयातल्या कामबंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना क्रिमिलेअर सर्टीफिकेट मिळाले नाही. त्यामुळे आज जे.जे. हॉस्पिटलबाहेर जमलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी डीन. तात्याराव लहानेंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा करत फॉर्म सबमिशनची तारीख वाढवून देण्याची विद्यार्थी-पालकांनी मागणी केली. दरम्यान, मेडिकलची पहिली प्रवेश यादी 18 जुलैला लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2011 04:22 PM IST

तहसीलदाराला मारहाणीमुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना फटका

12 जुलै

मेडिकल ऍडमिशनसाठी स्क्रुटीनी फॉर्म सबमिट करण्याची आज शेवटची तारीख होती. पण वाडा तहसीलदार मारहाण प्रकरणामुळे तहसीलदार कार्यालयात आज कामबंद आंदोलन केलं होतं. त्याचा फटका शेकडो विद्यार्थ्यांना आणि पालकांना बसला. स्क्रुटीनी फॉर्म सोबत क्रिमिलेअर सर्टिफिकेट सादर करायचं होतं.

पण तहसीलदार कार्यालयातल्या कामबंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना क्रिमिलेअर सर्टीफिकेट मिळाले नाही. त्यामुळे आज जे.जे. हॉस्पिटलबाहेर जमलेल्या पालक आणि विद्यार्थ्यांनी डीन. तात्याराव लहानेंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा करत फॉर्म सबमिशनची तारीख वाढवून देण्याची विद्यार्थी-पालकांनी मागणी केली. दरम्यान, मेडिकलची पहिली प्रवेश यादी 18 जुलैला लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2011 04:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close