S M L

बॉलीवूडच्या दोन मित्रांचा 'सिंघम'

अंतरा चौघुले,मुंबई12 जुलैया महिन्यात सगळे मोठे सिनेमे रिलीज होत आहे. रोहीत शेट्टी आणि अजय देवगण यांचा सिंघमही 22 जुलैला रिलीज होतोय. रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांची मैत्री तशी जुनी. दोघांनी मिळून भरपूर सिनेमे केले. रोहीत शेट्टी आणि अजय देवगण यांचा दोस्ताना बराच जुना आहे. जेव्हा अजय बॉलीवूडमध्ये एंट्री घेत होता तेव्हा रोहीतही एका बाजूने दिग्दर्शनाचे धडे गिरवत होता. 'फूल और काँटे' या अजय देवगणच्या पहिल्या सिनेमात तो असिस्टंट डायरेक्टर होता. त्यानंतर 2003 मध्ये त्याचा सोलो डायरेक्शन असलेला 'जमीन' आला त्यातही अजय मुख्य भूमिकेत होता.त्यानंतर कुकु कोहली यांना असिस्ट करताना रोहीतने अजून दोन सिेनमाचं काम पाहिलं. 'सुहाग' आणि 'हकीकत' आणि याही दोन्ही सिनेमांत अजयच्या भूमिका होत्या. 2006 साली आलेल्या गोलमालने वेगळाच ट्रेंड सुरु केला. या सारखा नव्या कॉन्सेप्टचा सिनेमा रोहीत शेट्टीने आणला खरा, पण दिलखुलास हसवणारे विनोद आणि अजय देवगण बरोबरच तगडी स्टारकास्ट यामुळे प्रेक्षकांना सिनेमा बघताना कुठेही कंटाळा आला नाही. अजय देवगण, शर्मन जोशी, तुषार कपूर आणि अर्शद वारसी या तिघांचही टायमिंग आणि सिनेमातला त्यांचा सहज वावर यामुळे सगळीच कॅरेक्टर्स खरी वाटली. पण 2008 साली आलेला रोहीतचा 'संडे' हा अजय देवगणची भूमिका असलेला सिेनमा सपशेल आपटला.गोलमालच्या प्रचंड प्रतिसादामुळे रोहीत शेट्टीने अजय देवगण ह्या आपल्या लकी मॅस्कॉटला घेउन 2008 मध्ये 'गोलमाल रिर्टन्स' बनवला. यात सिनेमाच्या अभिनेत्री करिना कपूर,अमृता अरोरा, सेलिना जेटली आणि अंजना सुखानी यांनी देखील आपल्या अभिनयामुळे कॉमेडीत भर पाडली. आधीच्या गोलमाल पेक्षा त्याचा सिक्विल जरा जास्तच मसालेदार होता. पण इथेही रोहीत-अजय ही जोडी हिट देण्यात यशस्वी ठरली2009 मध्ये गोलमालच्या चाकोरीतून बाहेर पडत पण कॉमेडीचा बाज तसाच ठेवत अजयला घेऊन रोहीतने 'ऑल द बेस्ट' बनवला. सिेनमात संजय दत्त, बिपाशा बासू, मुग्धा गोडसे आणि फरदीन खान यांच्याही भूमिका होत्या. कॉमेडीचा योग्य सुर गवसून देखील हा सिनेमा काही बॉक्स ऑफिसवर धम्माल करु शकला नाही.गोलमाल आणि गोलमाल रिर्टन्सनंतर रोहीतने पुन्हा एकदा अजयला घेउन त्याच स्टोरीलाईनवर थोडे फार बदल करत गोलमाल 3 हा सिनेमा बनवला. अजय देवगण, अर्शद वारसी याही सिनेमात होतेच पण करिना आणि श्रेयसही यात कुणाल खेमूबरोबर दिसले. रोहीत आणि अजय ह्या जोडीने आपल्या प्रत्येक सिनेमात वेगवेगळे स्टंण्टस् दाखवले आणि खळखळून आपल्याला हसवलंय पण त्यांचा आगामी सिनेमा सिंघम हा एक ऍक्शनपट असून यात जास्त स्टंण्टस् बघायला मिळतील हे नक्की. बोल बच्चन ह्या नव्या सिनेमातही अजय आणि रोहीत हे कॉम्बिनेशन असेल. 2012 मध्ये गोलमाल 4 बनवण्याचा ह्या जोडीचा मनसुबा आहे. सिंघमने फोडलेली डरकाळी बॉक्स ऑफिसवर यश मिळवायला कशी उपयोगी पडेल हे काही दिवसातच कळेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 12, 2011 05:21 PM IST

बॉलीवूडच्या दोन मित्रांचा 'सिंघम'

अंतरा चौघुले,मुंबई

12 जुलै

या महिन्यात सगळे मोठे सिनेमे रिलीज होत आहे. रोहीत शेट्टी आणि अजय देवगण यांचा सिंघमही 22 जुलैला रिलीज होतोय. रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांची मैत्री तशी जुनी. दोघांनी मिळून भरपूर सिनेमे केले.

रोहीत शेट्टी आणि अजय देवगण यांचा दोस्ताना बराच जुना आहे. जेव्हा अजय बॉलीवूडमध्ये एंट्री घेत होता तेव्हा रोहीतही एका बाजूने दिग्दर्शनाचे धडे गिरवत होता. 'फूल और काँटे' या अजय देवगणच्या पहिल्या सिनेमात तो असिस्टंट डायरेक्टर होता. त्यानंतर 2003 मध्ये त्याचा सोलो डायरेक्शन असलेला 'जमीन' आला त्यातही अजय मुख्य भूमिकेत होता.त्यानंतर कुकु कोहली यांना असिस्ट करताना रोहीतने अजून दोन सिेनमाचं काम पाहिलं. 'सुहाग' आणि 'हकीकत' आणि याही दोन्ही सिनेमांत अजयच्या भूमिका होत्या.

2006 साली आलेल्या गोलमालने वेगळाच ट्रेंड सुरु केला. या सारखा नव्या कॉन्सेप्टचा सिनेमा रोहीत शेट्टीने आणला खरा, पण दिलखुलास हसवणारे विनोद आणि अजय देवगण बरोबरच तगडी स्टारकास्ट यामुळे प्रेक्षकांना सिनेमा बघताना कुठेही कंटाळा आला नाही. अजय देवगण, शर्मन जोशी, तुषार कपूर आणि अर्शद वारसी या तिघांचही टायमिंग आणि सिनेमातला त्यांचा सहज वावर यामुळे सगळीच कॅरेक्टर्स खरी वाटली. पण 2008 साली आलेला रोहीतचा 'संडे' हा अजय देवगणची भूमिका असलेला सिेनमा सपशेल आपटला.

गोलमालच्या प्रचंड प्रतिसादामुळे रोहीत शेट्टीने अजय देवगण ह्या आपल्या लकी मॅस्कॉटला घेउन 2008 मध्ये 'गोलमाल रिर्टन्स' बनवला. यात सिनेमाच्या अभिनेत्री करिना कपूर,अमृता अरोरा, सेलिना जेटली आणि अंजना सुखानी यांनी देखील आपल्या अभिनयामुळे कॉमेडीत भर पाडली. आधीच्या गोलमाल पेक्षा त्याचा सिक्विल जरा जास्तच मसालेदार होता. पण इथेही रोहीत-अजय ही जोडी हिट देण्यात यशस्वी ठरली

2009 मध्ये गोलमालच्या चाकोरीतून बाहेर पडत पण कॉमेडीचा बाज तसाच ठेवत अजयला घेऊन रोहीतने 'ऑल द बेस्ट' बनवला. सिेनमात संजय दत्त, बिपाशा बासू, मुग्धा गोडसे आणि फरदीन खान यांच्याही भूमिका होत्या. कॉमेडीचा योग्य सुर गवसून देखील हा सिनेमा काही बॉक्स ऑफिसवर धम्माल करु शकला नाही.

गोलमाल आणि गोलमाल रिर्टन्सनंतर रोहीतने पुन्हा एकदा अजयला घेउन त्याच स्टोरीलाईनवर थोडे फार बदल करत गोलमाल 3 हा सिनेमा बनवला. अजय देवगण, अर्शद वारसी याही सिनेमात होतेच पण करिना आणि श्रेयसही यात कुणाल खेमूबरोबर दिसले.

रोहीत आणि अजय ह्या जोडीने आपल्या प्रत्येक सिनेमात वेगवेगळे स्टंण्टस् दाखवले आणि खळखळून आपल्याला हसवलंय पण त्यांचा आगामी सिनेमा सिंघम हा एक ऍक्शनपट असून यात जास्त स्टंण्टस् बघायला मिळतील हे नक्की. बोल बच्चन ह्या नव्या सिनेमातही अजय आणि रोहीत हे कॉम्बिनेशन असेल. 2012 मध्ये गोलमाल 4 बनवण्याचा ह्या जोडीचा मनसुबा आहे. सिंघमने फोडलेली डरकाळी बॉक्स ऑफिसवर यश मिळवायला कशी उपयोगी पडेल हे काही दिवसातच कळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2011 05:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close