S M L

'हॅरी पॉटर'ची शेवटची सफर

13 जुलैहॅरी पॉटर सीरिज मधल्या शेवटच्या सिनेमाचा प्रिमियर नुकताच पार पडला. 2001 पासून सुरु झालेली ही तुफान कथानकांची सफर आता संपणार म्हणून त्यातील कलाकारांसाठी आणि त्यांच्या फॅन्ससाठी प्रिमियरचं हे रेड कार्पेट इमोशनल ठरलं.अत्यंत भावपूर्ण आणि नॉस्टॅल्जिक झालेले हॅरी पॉटरचे फॅन्स यासिनेमातील कलाकार डॅनियल रॅडक्लिफ, इमा व्हॉटसन आणि रुपर्ट ग्रींट यांची एक झलक बघण्यासाठी धडपडत होते. निमित्त होतं हॅरी पॉटर ऍन्ड द डेथली हॅलोज पार्ट 2 चा न्यूयॉर्कमध्ये प्रिमियर.डॅनियल रॅडक्लिफ म्हणतो की, या क्षणी सर्वांनाच आनंद आणि दुख: होतय. कारण आम्हाला कधी वाटलं नव्हतं हा क्षण येईल पण आता तो आला. पण खरच हे खुप चांगलं निमित्त आहे. अभिनेत्री इमा व्हॉटसन म्हणते की, ज्याप्रमाणे या सिनेमाचा शेवट दाखवला त्यावर मी तरी खूश आहे. लंडनमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळं मी सध्या खूप आनंदात आहे. इमा व्हॉटसनने एका अभिनेत्री म्हणून नावलौकिक तर मिळवलच पण स्टाईलनं तिने स्वत:चा एक फार मोठा चाहतावर्ग निर्माण केला. यावेळीही रेड कार्पेटवर ती बोटेगा वॅनेटाच्या डिझायनर गाउनमध्ये अवतरली. प्रिमियरला साराह जेसिका पार्कर आणि मॅथ्यू ब्रॉडरिक यांचा मुलगा जेम्सही यावेळी रेड कार्पेटवर पाहायला मिळाले. पण या अमेरिकन स्वागतामुळे सिनेमातला एक स्टार मात्र चांगलाच भारावून गेलेला दिसला. अभिनेता रुपर्ट ग्रींट म्हणतो, हे खूपचं क्रेझी आहे. अमेरिकेची लोकं फार उत्साही आहेत आणि इथं अमेरिकेमध्ये तर ते जास्तच क्रेझी दिसत आहेत. हॅरी पॉटरच्या ह्या टीमला जगभरातील चाहते आठवण काढतील हे मात्र नक्की.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2011 11:38 AM IST

'हॅरी पॉटर'ची शेवटची सफर

13 जुलै

हॅरी पॉटर सीरिज मधल्या शेवटच्या सिनेमाचा प्रिमियर नुकताच पार पडला. 2001 पासून सुरु झालेली ही तुफान कथानकांची सफर आता संपणार म्हणून त्यातील कलाकारांसाठी आणि त्यांच्या फॅन्ससाठी प्रिमियरचं हे रेड कार्पेट इमोशनल ठरलं.

अत्यंत भावपूर्ण आणि नॉस्टॅल्जिक झालेले हॅरी पॉटरचे फॅन्स यासिनेमातील कलाकार डॅनियल रॅडक्लिफ, इमा व्हॉटसन आणि रुपर्ट ग्रींट यांची एक झलक बघण्यासाठी धडपडत होते. निमित्त होतं हॅरी पॉटर ऍन्ड द डेथली हॅलोज पार्ट 2 चा न्यूयॉर्कमध्ये प्रिमियर.

डॅनियल रॅडक्लिफ म्हणतो की, या क्षणी सर्वांनाच आनंद आणि दुख: होतय. कारण आम्हाला कधी वाटलं नव्हतं हा क्षण येईल पण आता तो आला. पण खरच हे खुप चांगलं निमित्त आहे. अभिनेत्री इमा व्हॉटसन म्हणते की, ज्याप्रमाणे या सिनेमाचा शेवट दाखवला त्यावर मी तरी खूश आहे. लंडनमध्ये आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळं मी सध्या खूप आनंदात आहे.

इमा व्हॉटसनने एका अभिनेत्री म्हणून नावलौकिक तर मिळवलच पण स्टाईलनं तिने स्वत:चा एक फार मोठा चाहतावर्ग निर्माण केला. यावेळीही रेड कार्पेटवर ती बोटेगा वॅनेटाच्या डिझायनर गाउनमध्ये अवतरली. प्रिमियरला साराह जेसिका पार्कर आणि मॅथ्यू ब्रॉडरिक यांचा मुलगा जेम्सही यावेळी रेड कार्पेटवर पाहायला मिळाले. पण या अमेरिकन स्वागतामुळे सिनेमातला एक स्टार मात्र चांगलाच भारावून गेलेला दिसला.

अभिनेता रुपर्ट ग्रींट म्हणतो, हे खूपचं क्रेझी आहे. अमेरिकेची लोकं फार उत्साही आहेत आणि इथं अमेरिकेमध्ये तर ते जास्तच क्रेझी दिसत आहेत. हॅरी पॉटरच्या ह्या टीमला जगभरातील चाहते आठवण काढतील हे मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2011 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close