S M L

राणेंना जनताच धडा शिकवेल !

13 जुलैजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍यांच्या सभा नारायण राणे समर्थकांनी उधळल्या. राणे असेच करत राहिले तर जनताच त्यांना बाजूला सारतील असा इशारा सीपीएमचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी दिला. डाव्या पक्षांच्या नेत्यांनी काल जैतापूरचा दौरा केला. राणे समर्थकांनी त्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या रविवारीसुद्धा कोकण विनाशकारी प्रकल्पविरोधी समितीची सभा राणे समर्थकांनी उधळली होती. सरकार अणुभट्‌ट्यांची खरी किंमत सांगत नाही हा प्रकल्प खूप महागडा असल्याचे कामत यांनी म्हटलं आहे. अणुऊर्जा प्रकल्पांना आपला विरोध कायम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी जैतापूरला भेट द्यावी असंही करात यांनी म्हंटलं आहे. दरम्यान, रत्नागिरी प्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची मुजोरी सुरू झाली. मंगळवारी वेंगुर्ल्यात राष्ट्रवादीच्या आमसभेत आमदार दीपक केसरकर यांच्यावर सभा सुरू असतानाच वेंगुर्ले युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षाने चप्पल फेकून मारल्याने काँग्रेस राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला. याबाबत पोलिसांनी सचिन शेट्ये याला अटक करून जामीनावर सोडूनही देण्यात आलं. आमदार केसरकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सिंधुदुर्गात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या दहशतीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. राजकीय दहशतीने आत्तापर्यंत सिंधुदुर्गात दोन बळी गेले असून तिसरा बळी माझा असू शकतो असही केसरकर यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2011 11:57 AM IST

राणेंना जनताच धडा शिकवेल !

13 जुलै

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍यांच्या सभा नारायण राणे समर्थकांनी उधळल्या. राणे असेच करत राहिले तर जनताच त्यांना बाजूला सारतील असा इशारा सीपीएमचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी दिला. डाव्या पक्षांच्या नेत्यांनी काल जैतापूरचा दौरा केला. राणे समर्थकांनी त्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न केला होता.

गेल्या रविवारीसुद्धा कोकण विनाशकारी प्रकल्पविरोधी समितीची सभा राणे समर्थकांनी उधळली होती. सरकार अणुभट्‌ट्यांची खरी किंमत सांगत नाही हा प्रकल्प खूप महागडा असल्याचे कामत यांनी म्हटलं आहे. अणुऊर्जा प्रकल्पांना आपला विरोध कायम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी जैतापूरला भेट द्यावी असंही करात यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, रत्नागिरी प्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची मुजोरी सुरू झाली. मंगळवारी वेंगुर्ल्यात राष्ट्रवादीच्या आमसभेत आमदार दीपक केसरकर यांच्यावर सभा सुरू असतानाच वेंगुर्ले युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षाने चप्पल फेकून मारल्याने काँग्रेस राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला.

याबाबत पोलिसांनी सचिन शेट्ये याला अटक करून जामीनावर सोडूनही देण्यात आलं. आमदार केसरकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सिंधुदुर्गात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या दहशतीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. राजकीय दहशतीने आत्तापर्यंत सिंधुदुर्गात दोन बळी गेले असून तिसरा बळी माझा असू शकतो असही केसरकर यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2011 11:57 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close