S M L

'युपीएससी'ची मुलाखत आता मराठीतून देता येणार

13 जुलैकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेत आता कोणत्याही भारतीय भाषेतून मुलाखत देता येईल. त्यामुळे महाराष्ट्रसह इतर राज्यातील अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. चित्तरंजन कुमार यांनी याविषयीची एक याचिका हायकोर्टात दाखल केली होती. इंग्रजी किवा हिंदी भाषेतूनच मुलाखत देण्याचा नियम बेकायदा असून हा निर्णय उमेदवारांच्या मुलभूत अधिकारां़वर गदा आणणारा असल्याचे याचिकेत म्हणण्यात आले होते. या परिक्षेला बसणारे बहुतांश उमेदवार ग्रामीण भागातील असतात त्यामुळे यातील सर्वच जण इंग्रजी व्यवस्थित बोलू शकणारे नसतात. त्यामुळे या परिक्षेची मुलाखत इंग्रजी आणि हिंदीव्यतिरिक्त इतर भाषेतून देण्याचा पर्याय उमेदवाराला असावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. यामागणीवर नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार आता निर्णय घेण्यात आला आहे. आणि आता विद्यार्थ्यांना कोणत्याही भारतीय भाषेमधून मुलाखत देता येईल. युपीएससीने मुंबई हायकोर्टात इंग्रजी आणि हिंदीव्यतिरिक्त कुठल्याही भारतीय भाषेतून मुलाखत देता येणार असल्याच सांगितले आहे. चित्तरंजन कुमार यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून युपीएससीची परिक्षा पास झालेल्या उमेदवारांला या मागणीवर नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार आता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रतिज्ञापत्र नमूद करण्यात आले. हेच प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरत मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांच्या खंडपीठाने या याचिकेवर हा निर्णय दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2011 10:53 AM IST

'युपीएससी'ची मुलाखत आता मराठीतून देता येणार

13 जुलै

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परिक्षेत आता कोणत्याही भारतीय भाषेतून मुलाखत देता येईल. त्यामुळे महाराष्ट्रसह इतर राज्यातील अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. चित्तरंजन कुमार यांनी याविषयीची एक याचिका हायकोर्टात दाखल केली होती. इंग्रजी किवा हिंदी भाषेतूनच मुलाखत देण्याचा नियम बेकायदा असून हा निर्णय उमेदवारांच्या मुलभूत अधिकारां़वर गदा आणणारा असल्याचे याचिकेत म्हणण्यात आले होते.

या परिक्षेला बसणारे बहुतांश उमेदवार ग्रामीण भागातील असतात त्यामुळे यातील सर्वच जण इंग्रजी व्यवस्थित बोलू शकणारे नसतात. त्यामुळे या परिक्षेची मुलाखत इंग्रजी आणि हिंदीव्यतिरिक्त इतर भाषेतून देण्याचा पर्याय उमेदवाराला असावा अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. यामागणीवर नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार आता निर्णय घेण्यात आला आहे. आणि आता विद्यार्थ्यांना कोणत्याही भारतीय भाषेमधून मुलाखत देता येईल.

युपीएससीने मुंबई हायकोर्टात इंग्रजी आणि हिंदीव्यतिरिक्त कुठल्याही भारतीय भाषेतून मुलाखत देता येणार असल्याच सांगितले आहे. चित्तरंजन कुमार यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून युपीएससीची परिक्षा पास झालेल्या उमेदवारांला या मागणीवर नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार आता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रतिज्ञापत्र नमूद करण्यात आले. हेच प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरत मुख्य न्यायमूर्ती मोहित शाह यांच्या खंडपीठाने या याचिकेवर हा निर्णय दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2011 10:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close