S M L

कोकणात प्रकल्पविरोधी सभांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा धुडगूस सुरूच

13 जुलैरत्नागिरी प्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची मुजोरी सुरू झाली. मंगळवारी वेंगुर्ल्यात राष्ट्रवादीच्या आमसभेत आमदार दीपक केसरकर यांच्यावर सभा सुरू असतानाच वेंगुर्ले युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षाने चप्पल फेकून मारल्याने काँग्रेस राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला. याबाबत पोलिसांनी सचिन शेट्ये याला अटक करून जामीनावर सोडूनही देण्यात आलं. आमदार केसरकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सिंधुदुर्गात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या दहशतीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. राजकीय दहशतीने आत्तापर्यंत सिंधुदुर्गात दोन बळी गेले असून तिसरा बळी माझा असू शकतो असही केसरकर यांनी म्हटलं आहे.दरम्यान, रविवारी कोकण विनाशकारी प्रकल्पविरोधी समितीची सर्वसाधारण सभाही राणे समर्थकांनी उधळून लावली होती. रत्नागिरी नगरवाचनालयात ही सभा सुरू होती. सभेत कोकणातल्या पर्यावरणवादी तसेच उर्जा आणि मायनिंग प्रकल्पविरोधी संघटानांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी नारायण राणे आणी निलेश राणे जिंदाबादच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी सभा उधळली. अशा प्रकारची कोणतीही सभा यापुढे रत्नागिरी शहरात होऊ देणार नाही, असा इशाराही राणे समर्थकांनी दिला. आणि त्यापाठोपाठच काल मंगळवारी डाव्या पक्षांनी जैतापूर प्रकल्पाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी घेतलेली बैठक ही उधळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी वेळी हस्तक्षेप करून काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसुबा हाणून पाडला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 13, 2011 11:02 AM IST

कोकणात प्रकल्पविरोधी सभांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा धुडगूस सुरूच

13 जुलै

रत्नागिरी प्रमाणेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची मुजोरी सुरू झाली. मंगळवारी वेंगुर्ल्यात राष्ट्रवादीच्या आमसभेत आमदार दीपक केसरकर यांच्यावर सभा सुरू असतानाच वेंगुर्ले युवक काँग्रेसच्या शहर अध्यक्षाने चप्पल फेकून मारल्याने काँग्रेस राष्ट्रवादीत तणाव निर्माण झाला.

याबाबत पोलिसांनी सचिन शेट्ये याला अटक करून जामीनावर सोडूनही देण्यात आलं. आमदार केसरकर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सिंधुदुर्गात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सुरू असलेल्या दहशतीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. राजकीय दहशतीने आत्तापर्यंत सिंधुदुर्गात दोन बळी गेले असून तिसरा बळी माझा असू शकतो असही केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रविवारी कोकण विनाशकारी प्रकल्पविरोधी समितीची सर्वसाधारण सभाही राणे समर्थकांनी उधळून लावली होती. रत्नागिरी नगरवाचनालयात ही सभा सुरू होती. सभेत कोकणातल्या पर्यावरणवादी तसेच उर्जा आणि मायनिंग प्रकल्पविरोधी संघटानांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

यावेळी नारायण राणे आणी निलेश राणे जिंदाबादच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी सभा उधळली. अशा प्रकारची कोणतीही सभा यापुढे रत्नागिरी शहरात होऊ देणार नाही, असा इशाराही राणे समर्थकांनी दिला.

आणि त्यापाठोपाठच काल मंगळवारी डाव्या पक्षांनी जैतापूर प्रकल्पाची पाहणी करून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी घेतलेली बैठक ही उधळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी वेळी हस्तक्षेप करून काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसुबा हाणून पाडला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 13, 2011 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close