S M L

टायमरच्या मदतीने घडवला स्फोट - चिदंबरम

14 जुलैकेंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम काल रात्री साडे अकरावाजता मुंबईत दाखल झाले. रात्री त्यांनी तीनही घटना स्थळांची पाहणी केली. आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या स्फोटांच्या संदर्भात गुप्तचर यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारचा इशारा देण्यात आला नव्हता पण याचा अर्थ हे यंत्रणांचे अपयश आहे असा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. हा स्फोट अमोनियम नायट्रेड आणि टायमरच्या मदतीने घडवला आहे. स्फोटासाठी रिमोट कंट्रोलचा वापर केला नाही. या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला आहे असा अधिकृत आकडा सांगितला. तर 131 जण जखमी आहे तर 23 जण गंभीर जखमी आहे. स्फोटांसंदर्भातले सगळे पुरावे रात्रीत गोळा करण्यात आले आहेत. आतापर्यंत कोणत्याही अतिरेकी संघटनांनी या हल्ल्यांची जबाबदारी स्विकारली नसून सगळ्याच शक्यतांचा तपास सुरू असल्याचं पी. चिदंबरम यांनी सांगितलं. कालच्या तीन स्फोटांमध्ये ठार झालेल्या 17 जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आलीय. तर जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येईल. शिवाय जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 14, 2011 06:42 AM IST

टायमरच्या मदतीने घडवला स्फोट - चिदंबरम

14 जुलै

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम काल रात्री साडे अकरावाजता मुंबईत दाखल झाले. रात्री त्यांनी तीनही घटना स्थळांची पाहणी केली. आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या स्फोटांच्या संदर्भात गुप्तचर यंत्रणांकडून कोणत्याही प्रकारचा इशारा देण्यात आला नव्हता पण याचा अर्थ हे यंत्रणांचे अपयश आहे असा होत नसल्याचे त्यांनी सांगितले.

हा स्फोट अमोनियम नायट्रेड आणि टायमरच्या मदतीने घडवला आहे. स्फोटासाठी रिमोट कंट्रोलचा वापर केला नाही. या स्फोटात 17 जणांचा मृत्यू झाला आहे असा अधिकृत आकडा सांगितला. तर 131 जण जखमी आहे तर 23 जण गंभीर जखमी आहे. स्फोटांसंदर्भातले सगळे पुरावे रात्रीत गोळा करण्यात आले आहेत. आतापर्यंत कोणत्याही अतिरेकी संघटनांनी या हल्ल्यांची जबाबदारी स्विकारली नसून सगळ्याच शक्यतांचा तपास सुरू असल्याचं पी. चिदंबरम यांनी सांगितलं.

कालच्या तीन स्फोटांमध्ये ठार झालेल्या 17 जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आलीय. तर जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येईल. शिवाय जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 14, 2011 06:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close