S M L

मुंबईत पावसाचा कहर ; रेल्वे सेवा ठप्प

14 जुलैमुंबई आणि उपनगरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसाचा सेंट्रल आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला असून रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. ठाणे ते कल्याण दरम्यानची वाहतूक 35 मिनिटं उशीरा सुरू आहे तर हार्बर रेल्वेही 20 ते 25 मिनिटंउशीरा धावत आहे. सायन, कुर्ला, कळवा स्टेशनला स्लो ट्रकवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाचा परिणाम रस्ता वाहतुकीवरही झाला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक खोळंबली आहे. ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. घोडबंदर रोडवर पाणी साचल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. तर वंदना सिनेमा, आंबेडकर नगर, पाटीलवाडी इथं पाणी साचलं आहे. दरम्यान, कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कुलाब्यामध्ये 57.1 मिली मीटर, सांताक्रुझमध्ये 93 मिमी, मुंबई शहरात 55.3 मिमी, पूर्व उपनगरात 85.5 मिमी, पश्चिम उपनगरात 122 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर समुद्रात 11 वाजून 56 मिनिटांनी 4.40 मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात येते. दरम्यान, पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याचा इशारा देत गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन आपत्ती व्यवस्थापनाने केलेलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 14, 2011 07:44 AM IST

मुंबईत पावसाचा कहर ; रेल्वे सेवा ठप्प

14 जुलै

मुंबई आणि उपनगरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसाचा सेंट्रल आणि हार्बर रेल्वेवर परिणाम झाला असून रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. ठाणे ते कल्याण दरम्यानची वाहतूक 35 मिनिटं उशीरा सुरू आहे तर हार्बर रेल्वेही 20 ते 25 मिनिटंउशीरा धावत आहे. सायन, कुर्ला, कळवा स्टेशनला स्लो ट्रकवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाचा परिणाम रस्ता वाहतुकीवरही झाला.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक खोळंबली आहे. ठाणे जिल्ह्यातही मुसळधार पावसाने हजेरी लावली. घोडबंदर रोडवर पाणी साचल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली. तर वंदना सिनेमा, आंबेडकर नगर, पाटीलवाडी इथं पाणी साचलं आहे.

दरम्यान, कुलाबा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कुलाब्यामध्ये 57.1 मिली मीटर, सांताक्रुझमध्ये 93 मिमी, मुंबई शहरात 55.3 मिमी, पूर्व उपनगरात 85.5 मिमी, पश्चिम उपनगरात 122 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तर समुद्रात 11 वाजून 56 मिनिटांनी 4.40 मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात येते. दरम्यान, पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याचा इशारा देत गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असं आवाहन आपत्ती व्यवस्थापनाने केलेलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 14, 2011 07:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close