S M L

हल्ल्याचा तपास एटीएस आणि मुंबई क्राईम ब्रँच एकत्र करणार

14 जुलै, मुंबईगुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास एटीएस आणि मुंबई क्राईम ब्रँच एकत्र करणार आहे. याबद्दल एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने एटीएस आणि मुंबई क्राईम ब्रँच एकत्र तपास करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.मुंबईतल्या स्फोटाला 24 तास उलटल्यानंतर आता तपास वेगानं सुरू झाला.या स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर केला गेला आणि टायमर बॉम्ब वापरण्यात आला असं एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी स्पष्ट केलं. ऑपेरा हाऊसमध्ये झालेला स्फोट सगळ्यात तीव्र होता. तिन्ही ठिकाणचं CCTV फूटेज मिळालं आहे. स्फोटासाठी मानवी बॉम्बचा वापर झाला का हे आताच बोलणं घाईचं ठरेल असंही मारिया यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 14, 2011 06:17 PM IST

हल्ल्याचा तपास एटीएस आणि मुंबई क्राईम ब्रँच एकत्र करणार

14 जुलै, मुंबई

गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास एटीएस आणि मुंबई क्राईम ब्रँच एकत्र करणार आहे. याबद्दल एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने एटीएस आणि मुंबई क्राईम ब्रँच एकत्र तपास करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मुंबईतल्या स्फोटाला 24 तास उलटल्यानंतर आता तपास वेगानं सुरू झाला.या स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर केला गेला आणि टायमर बॉम्ब वापरण्यात आला असं एटीएसचे प्रमुख राकेश मारिया यांनी स्पष्ट केलं. ऑपेरा हाऊसमध्ये झालेला स्फोट सगळ्यात तीव्र होता. तिन्ही ठिकाणचं CCTV फूटेज मिळालं आहे. स्फोटासाठी मानवी बॉम्बचा वापर झाला का हे आताच बोलणं घाईचं ठरेल असंही मारिया यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 14, 2011 06:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close