S M L

बॉम्बस्फोटात 17 ठार, कुटुंबीयांना पाच लाखाची मदत

14 जुलै, मुंबईमुंबईत बुधवारी संध्याकाळी झालेल्या तीन स्फोटांमध्ये 17 जण मृत्यूमुखी पडले, तर 133 जण जखमी झाले आहेत.या स्फोटांमध्ये ऑपेरा हाऊस इथे सर्वात जास्त हानी झाली. या ठिकाणी 10 ठार आणि 73 जखमी झाले. तर झवेरी बाजार इथे 7 ठार, 50 जखमी आणि दादर इथे 10 जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं हॉस्पिटलने गुरुवारी जाहीर केली. बॉम्बे हॉस्पिटल- हिम्मतभाई काळुभाई गाडिया (49) ; जे.जे. हॉस्पिटल- गुमान सिंग मोहर सिंग राठोड (35), लालचंद अहुजा (45), हरकिशनदास हॉस्पिटल- मोहन नायर (46), तुषार कोळंबे (30), सुनील कुमार जैन; सैफी हॉस्पिटल- तुषार रमेशचंद्र शहा (48), संदीप चंपकलाल शहा (38), अजगर दरोडिया ; जीटी हॉस्पिटल- राजेश खामजी खेडेकर (28), पंकज सोनी (22), प्रेमा मोतीलाल सोनी (45), किशन शिवसदन मंडल( 35). जे.जे. येथील 3 मृतदेहांची तर सैफी हॉस्पिटलमधील एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही.बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या 17 जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येईल. शिवाय जखमींच्या उपचाराचा खर्च राज्यसरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 14, 2011 01:58 PM IST

बॉम्बस्फोटात 17 ठार,  कुटुंबीयांना पाच लाखाची मदत

14 जुलै, मुंबई

मुंबईत बुधवारी संध्याकाळी झालेल्या तीन स्फोटांमध्ये 17 जण मृत्यूमुखी पडले, तर 133 जण जखमी झाले आहेत.या स्फोटांमध्ये ऑपेरा हाऊस इथे सर्वात जास्त हानी झाली. या ठिकाणी 10 ठार आणि 73 जखमी झाले. तर झवेरी बाजार इथे 7 ठार, 50 जखमी आणि दादर इथे 10 जखमी झाले आहेत. मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं हॉस्पिटलने गुरुवारी जाहीर केली.

बॉम्बे हॉस्पिटल- हिम्मतभाई काळुभाई गाडिया (49) ; जे.जे. हॉस्पिटल- गुमान सिंग मोहर सिंग राठोड (35), लालचंद अहुजा (45), हरकिशनदास हॉस्पिटल- मोहन नायर (46), तुषार कोळंबे (30), सुनील कुमार जैन; सैफी हॉस्पिटल- तुषार रमेशचंद्र शहा (48), संदीप चंपकलाल शहा (38), अजगर दरोडिया ; जीटी हॉस्पिटल- राजेश खामजी खेडेकर (28), पंकज सोनी (22), प्रेमा मोतीलाल सोनी (45), किशन शिवसदन मंडल( 35). जे.जे. येथील 3 मृतदेहांची तर सैफी हॉस्पिटलमधील एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या 17 जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येईल. शिवाय जखमींच्या उपचाराचा खर्च राज्यसरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 14, 2011 01:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close