S M L

बॉम्बस्फोट प्रकरणी 'सिमी'शी संबंधितांची चौकशी

15 जुलैमुंबईत झालेल्या साखळी स्फोटांच्या तपासाला वेग आला आहे. नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एनआयएने या संदर्भात झारखंडमध्ये छापे टाकले आहे. 'सिमी' या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित काही लोकांची तपास अधिकार्‍यांनी चौकशी केली. यात मंझर इमाम याची चौकशी करण्यात आली. मंझर हा अहमदाबाद बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या दानिश रियाझ याचा मित्र आहे. दानिश सध्या तुरुंगात आहे. तर मुंबईत एनआयएचं पथक झवेरी बाजारमध्ये दाखल झालं आहे.स्फोटाचे पुरावे जमा करण्याचं काम सुरू आहे.त्या दोन मोटरसायकलमध्ये स्फोटमुंबईत ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर या 3 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. यापैकी झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस या दोन ठिकाणी जे स्फोट झाले होते ते मोटरसायकलमध्ये लपवलेल्या स्फोटकांमुळे झाले. या भागातील इतर सगळ्या मोटरसायकल ज्यांच्या होत्या त्यांनी कागदपत्र दाखवून त्या आपल्या ताब्यात घेतल्या आहे. पण झवेरी बाजारजवळ एक होंडा ऍक्टिवा आणि ऑपेरा हाऊसजवळ एका स्प्लेंडरमध्ये स्फोट झाल्याची पोलिसांची माहिती आहे. या दोन्ही बाईक्सचा संपूर्ण तपशील तपास यंत्रणांनी घेतला आहे. या मोटरसायकल कोणाच्या मालकीच्या आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 15, 2011 09:33 AM IST

बॉम्बस्फोट प्रकरणी 'सिमी'शी संबंधितांची चौकशी

15 जुलै

मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांच्या तपासाला वेग आला आहे. नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच एनआयएने या संदर्भात झारखंडमध्ये छापे टाकले आहे. 'सिमी' या बंदी घातलेल्या संघटनेशी संबंधित काही लोकांची तपास अधिकार्‍यांनी चौकशी केली. यात मंझर इमाम याची चौकशी करण्यात आली. मंझर हा अहमदाबाद बॉम्बस्फोटात आरोपी असलेल्या दानिश रियाझ याचा मित्र आहे. दानिश सध्या तुरुंगात आहे. तर मुंबईत एनआयएचं पथक झवेरी बाजारमध्ये दाखल झालं आहे.स्फोटाचे पुरावे जमा करण्याचं काम सुरू आहे.

त्या दोन मोटरसायकलमध्ये स्फोट

मुंबईत ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार आणि दादर या 3 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. यापैकी झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस या दोन ठिकाणी जे स्फोट झाले होते ते मोटरसायकलमध्ये लपवलेल्या स्फोटकांमुळे झाले. या भागातील इतर सगळ्या मोटरसायकल ज्यांच्या होत्या त्यांनी कागदपत्र दाखवून त्या आपल्या ताब्यात घेतल्या आहे. पण झवेरी बाजारजवळ एक होंडा ऍक्टिवा आणि ऑपेरा हाऊसजवळ एका स्प्लेंडरमध्ये स्फोट झाल्याची पोलिसांची माहिती आहे. या दोन्ही बाईक्सचा संपूर्ण तपशील तपास यंत्रणांनी घेतला आहे. या मोटरसायकल कोणाच्या मालकीच्या आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 15, 2011 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close