S M L

बॉम्बस्फोटातील संशयिताचा मृत्यू

17 जुलैमुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित फैज उस्मानी याच्या मृत्यू झाला आहे.याचा तपास आता सीआयडीला सोपवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. मुंबईत 13 जुलैला झालेल्या तीन बॉम्बस्फोटांप्रकरणी पोलिसांनी फैज उस्मानी या संशयिताला ताब्यात घेतलं होतं. फैजला काल चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पण त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान हायपर टेन्शनमुळे त्याचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केला. तसेच त्याचा शारिरीक छळ करण्यात आला नव्हता असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. पण पोलिसांच्या चौकशीदरम्यान फैजचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. दरम्यान फैजच्या मृतदेहाचे सायन हॉस्पिटलमध्येच पोस्टमॉर्टेम करण्यात येणार आहे. फैज उस्मानी हा 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी अफजल उस्मानी याचा भाऊ आहे.तर 13 जुलैला मुंबईत झालेल्या स्फोटाच्या तपासाला आता वेग आला आहे. यात इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित असलेल्यांची चौकशी करण्यात येते. एटीएसचं एक पथक अहमदाबादला रवाना झालं आहे. 2008 मध्ये अहमदाबादला झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंध असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या हस्तकांची हे पथक चौकशी करणार आहे. हे पथक दानिश रियाझचीही चौकशी करणार असल्याचं समजतं. अहमदाबाद बाँबस्फोटातील आरोपी आणि मुजाहिद्दीन संघनटनेचे नेते असलेल्या भटकळ बंधूंच्या राहण्याची सोय केल्याचा आरोप दानिशवर आहे. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. दानिश हा मुळाचा रांचीचा रहिवासी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 17, 2011 09:33 AM IST

बॉम्बस्फोटातील संशयिताचा मृत्यू

17 जुलै

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित फैज उस्मानी याच्या मृत्यू झाला आहे.याचा तपास आता सीआयडीला सोपवण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली. मुंबईत 13 जुलैला झालेल्या तीन बॉम्बस्फोटांप्रकरणी पोलिसांनी फैज उस्मानी या संशयिताला ताब्यात घेतलं होतं. फैजला काल चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

पण त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान हायपर टेन्शनमुळे त्याचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केला. तसेच त्याचा शारिरीक छळ करण्यात आला नव्हता असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

पण पोलिसांच्या चौकशीदरम्यान फैजचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. दरम्यान फैजच्या मृतदेहाचे सायन हॉस्पिटलमध्येच पोस्टमॉर्टेम करण्यात येणार आहे. फैज उस्मानी हा 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी अफजल उस्मानी याचा भाऊ आहे.

तर 13 जुलैला मुंबईत झालेल्या स्फोटाच्या तपासाला आता वेग आला आहे. यात इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित असलेल्यांची चौकशी करण्यात येते. एटीएसचं एक पथक अहमदाबादला रवाना झालं आहे. 2008 मध्ये अहमदाबादला झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंध असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या हस्तकांची हे पथक चौकशी करणार आहे.

हे पथक दानिश रियाझचीही चौकशी करणार असल्याचं समजतं. अहमदाबाद बाँबस्फोटातील आरोपी आणि मुजाहिद्दीन संघनटनेचे नेते असलेल्या भटकळ बंधूंच्या राहण्याची सोय केल्याचा आरोप दानिशवर आहे. याप्रकरणी त्याला अटकही झाली होती. दानिश हा मुळाचा रांचीचा रहिवासी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 17, 2011 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close