S M L

इंग्लंड दौर्‍यातील सराव सामना रद्द

18 जुलैइंग्लंड दौर्‍यातील पहिला सराव सामना अखेर भारतीय टीमने ड्रॉ केली. पण बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये आलेलं अपयश नक्कीच सलणारे आहे. सुरेश रैनाने केलेली नॉटआऊट सेंच्युरी हा एकमेव दिलासा भारतीय टीमला मिळाला. काल मॅचच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी आठ विकेटवर 138 च्या स्कोअरवरुन भारतीय टीमने खेळ पुढे सुरु केला. आणि पहिल्या सेशनमघ्ये रैनाचा झंझावात बघायला मिळाला. अडीच तासात त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली. त्यामुळे भारतीय टीमने निदान दोनशेचा टप्पा ओलांडला. पण त्यानंतर सॉमरसेट काऊंटी टीमने आपल्या दुसर्‍या इनिंगमध्ये भारतीय बॉलर्सना पुन्हा एकदा रडवलं. झहीर, मुनाफ आणि श्रीसंत या तिघांनाही आपली छाप पाडता आली नाही. आणि सॉमरसेटने 41 ओव्हरमध्येच 2 विकेटवर 260 रन करत इनिंग घोषित केली. अँड्र्यू स्ट्राऊसने सेंच्युरी ठोकली. भारतासमोर 462 रनचं अशक्यप्राय आव्हान होतं. पण पावसामुळे खेळ लगेचच थांबवावा लागला. त्यापूर्वी भारताने दुसर्‍या इनिंगमध्ये एकही विकेट न गमावता 69 रन केले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 18, 2011 11:46 AM IST

इंग्लंड दौर्‍यातील सराव सामना रद्द

18 जुलै

इंग्लंड दौर्‍यातील पहिला सराव सामना अखेर भारतीय टीमने ड्रॉ केली. पण बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये आलेलं अपयश नक्कीच सलणारे आहे. सुरेश रैनाने केलेली नॉटआऊट सेंच्युरी हा एकमेव दिलासा भारतीय टीमला मिळाला. काल मॅचच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी आठ विकेटवर 138 च्या स्कोअरवरुन भारतीय टीमने खेळ पुढे सुरु केला.

आणि पहिल्या सेशनमघ्ये रैनाचा झंझावात बघायला मिळाला. अडीच तासात त्याने आपली सेंच्युरी पूर्ण केली. त्यामुळे भारतीय टीमने निदान दोनशेचा टप्पा ओलांडला. पण त्यानंतर सॉमरसेट काऊंटी टीमने आपल्या दुसर्‍या इनिंगमध्ये भारतीय बॉलर्सना पुन्हा एकदा रडवलं.

झहीर, मुनाफ आणि श्रीसंत या तिघांनाही आपली छाप पाडता आली नाही. आणि सॉमरसेटने 41 ओव्हरमध्येच 2 विकेटवर 260 रन करत इनिंग घोषित केली. अँड्र्यू स्ट्राऊसने सेंच्युरी ठोकली. भारतासमोर 462 रनचं अशक्यप्राय आव्हान होतं. पण पावसामुळे खेळ लगेचच थांबवावा लागला. त्यापूर्वी भारताने दुसर्‍या इनिंगमध्ये एकही विकेट न गमावता 69 रन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2011 11:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close