S M L

कॅश फॉर व्होटप्रकरणी अमरसिंग अडचणीत

18 जुलै2008 मध्ये झालेल्या कॅश फॉर व्होटप्रकरणी समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी रविवारी अमरसिंग यांचे माजी सहकारी संजीव सक्सेना यांना अटक करण्यात आली. सक्सेना यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात अमरसिंग यांचे नाव घेतले. मनमोहन सिंग यांचे सरकार वाचवण्यासाठी खासदारांना दिलेले पैसे अमरसिंग यांच्याकडूनच मिळाले होते. हे पैसे संबंधित खासदारांपर्यंत पोचवण्यासाठी अमरसिंग यांचा ड्रायव्हर संजय हासुद्धा आपल्यासोबत आला होता असा गौप्यस्फोट सक्सेना यांनी केला. भाजपचे खासदार फगनसिंग कुलस्ते आणि महावीर भगोडा यांनीही अमर सिंग यांचं नाव घेतलं होतं. अमर सिंग यांनीच सक्सेना यांची आपले सचिव म्हणून ओळख करून दिली होती असा आरोप त्यांनी केला होता. संसदेत विश्वासदर्शक ठराव सादर करण्यापूर्वी भाजपच्या खासदारांना पैसे देताना सक्सेना रंगेहाथ सापडले होते. सीएनएन-आयबीएनने हे स्टींग ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर तीन वर्षांनी या प्रकरणी पहिली अटक झाली. सक्सेना यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना कोर्टाने 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 18, 2011 05:55 PM IST

कॅश फॉर व्होटप्रकरणी अमरसिंग अडचणीत

18 जुलै

2008 मध्ये झालेल्या कॅश फॉर व्होटप्रकरणी समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंग अडचणीत येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी रविवारी अमरसिंग यांचे माजी सहकारी संजीव सक्सेना यांना अटक करण्यात आली. सक्सेना यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात अमरसिंग यांचे नाव घेतले. मनमोहन सिंग यांचे सरकार वाचवण्यासाठी खासदारांना दिलेले पैसे अमरसिंग यांच्याकडूनच मिळाले होते.

हे पैसे संबंधित खासदारांपर्यंत पोचवण्यासाठी अमरसिंग यांचा ड्रायव्हर संजय हासुद्धा आपल्यासोबत आला होता असा गौप्यस्फोट सक्सेना यांनी केला. भाजपचे खासदार फगनसिंग कुलस्ते आणि महावीर भगोडा यांनीही अमर सिंग यांचं नाव घेतलं होतं. अमर सिंग यांनीच सक्सेना यांची आपले सचिव म्हणून ओळख करून दिली होती असा आरोप त्यांनी केला होता.

संसदेत विश्वासदर्शक ठराव सादर करण्यापूर्वी भाजपच्या खासदारांना पैसे देताना सक्सेना रंगेहाथ सापडले होते. सीएनएन-आयबीएनने हे स्टींग ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर तीन वर्षांनी या प्रकरणी पहिली अटक झाली. सक्सेना यांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना कोर्टाने 3 दिवसांची पोलीस कोठडी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2011 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close