S M L

फैज उस्मानीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

18 जुलैमुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या फैज उस्मानीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं आढळून आलं. फैजच्या मृतदेहाचे सायन हॉस्पिटलमध्येच पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. त्यावेळी फैजच्या शरिरावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा आढळल्या नाहीत. फैज उस्मानी हा 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातला आरोपी अफजल उस्मानी याचा भाऊ आहे. मुंबई स्फोटाप्रकरणी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. पण त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सायन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. उपचारादरम्यान हायपर टेन्शनमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला. पण कोठडीत पोलिसांनी त्याचा छळ केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. त्याच्या मृत्यूचा तपास आता सीआयडी करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 18, 2011 06:03 PM IST

फैज उस्मानीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

18 जुलै

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या फैज उस्मानीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं आढळून आलं. फैजच्या मृतदेहाचे सायन हॉस्पिटलमध्येच पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. त्यावेळी फैजच्या शरिरावर कोणत्याही प्रकारच्या मारहाणीच्या खुणा आढळल्या नाहीत.

फैज उस्मानी हा 2008 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातला आरोपी अफजल उस्मानी याचा भाऊ आहे. मुंबई स्फोटाप्रकरणी त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. पण त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने सायन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं.

उपचारादरम्यान हायपर टेन्शनमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला. पण कोठडीत पोलिसांनी त्याचा छळ केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला. त्याच्या मृत्यूचा तपास आता सीआयडी करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 18, 2011 06:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close