S M L

अमरसिंग यांच्या चौकशीची पोलिसांनी मागितली परवानगी

19 जुलै2008 मधील कॅश फॉर व्होटप्रकरणी समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस अमरसिंग यांच्या चौकशीची परवानगी दिल्ली पोलिसांनी मागितली आहे. याबाबत पोलिसांनी गृहविभागाला पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमरसिंग यांच्यासोबतच भाजपचे खासदार अशोक अर्गल यांचीही चौकशी करण्याची परवानगी पोलिसांनी मागितली. पण, या दोघांची चौकशी करण्यासाठी पोलिसांना आपल्या परवानगीची गरज नसल्याचे गृहविभागाचे मत आहे.संसदीय प्रक्रियेनुसार खासदारांच्या चौकशीची परवानगी लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे मागणं आवश्यक आहे. अमरसिंग हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे हमीद अन्सारी यांच्या परवानगीची गरज आहे. पण कॅश फॉर व्होट प्रकरण लोकसभेत घडलं होतं. त्यामुळे मीराकुमारही त्यात हस्तक्षेप करू शकतात. या गुंतागुंतीमुळे चौकशीच्या प्रक्रियेला वेळ लागणार असं दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2011 05:32 PM IST

अमरसिंग यांच्या चौकशीची पोलिसांनी मागितली परवानगी

19 जुलै

2008 मधील कॅश फॉर व्होटप्रकरणी समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस अमरसिंग यांच्या चौकशीची परवानगी दिल्ली पोलिसांनी मागितली आहे. याबाबत पोलिसांनी गृहविभागाला पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अमरसिंग यांच्यासोबतच भाजपचे खासदार अशोक अर्गल यांचीही चौकशी करण्याची परवानगी पोलिसांनी मागितली. पण, या दोघांची चौकशी करण्यासाठी पोलिसांना आपल्या परवानगीची गरज नसल्याचे गृहविभागाचे मत आहे.संसदीय प्रक्रियेनुसार खासदारांच्या चौकशीची परवानगी लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे मागणं आवश्यक आहे.

अमरसिंग हे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यामुळे हमीद अन्सारी यांच्या परवानगीची गरज आहे. पण कॅश फॉर व्होट प्रकरण लोकसभेत घडलं होतं. त्यामुळे मीराकुमारही त्यात हस्तक्षेप करू शकतात. या गुंतागुंतीमुळे चौकशीच्या प्रक्रियेला वेळ लागणार असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2011 05:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close