S M L

पाकने दहशतवाद्यांना थारा देणे बंद करावे - हिलरी क्लिंटन

19 जुलैभारत आणि अमेरिकेत दुसर्‍या फेरीतली चर्चा आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यात बैठक झाली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना हिलरी क्लिंटन यांनी भारताच्या न्यूक्लिअर लायबिलिटी कायद्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच पाकिस्तानने स्वतःच्या भल्यासाठी दहशतवाद्यांना थारा देणं बंद करावे असा इशारा त्यांनी दिला. न्यूक्लिअर लायबिलिटी कायद्यासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेसोबत चर्चा करायला हवी असं त्या म्हणाल्या. भारताला न्यूक्लिअर एनरीचमेंट आणि रिप्रोसेसिंग तंत्रज्ञान देण्याबाबत त्यांनी कोणतंही आश्वासन दिलं नाही.अमेरिकन उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबई हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. भारत आणि अमेरिकेला दहशतवादाचा समान धोका आहे, असं त्या म्हणाल्या. तर दहशतवादासह सर्वच मुद्द्यांवर भारत आणि अमेरिकेत परस्पर सहकार्य वाढवण्यावर एकमत झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी सांगितले.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 19, 2011 06:20 PM IST

पाकने दहशतवाद्यांना थारा देणे बंद करावे - हिलरी क्लिंटन

19 जुलै

भारत आणि अमेरिकेत दुसर्‍या फेरीतली चर्चा आज नवी दिल्लीत झाली. परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्यात बैठक झाली. त्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलताना हिलरी क्लिंटन यांनी भारताच्या न्यूक्लिअर लायबिलिटी कायद्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच पाकिस्तानने स्वतःच्या भल्यासाठी दहशतवाद्यांना थारा देणं बंद करावे असा इशारा त्यांनी दिला.

न्यूक्लिअर लायबिलिटी कायद्यासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेसोबत चर्चा करायला हवी असं त्या म्हणाल्या. भारताला न्यूक्लिअर एनरीचमेंट आणि रिप्रोसेसिंग तंत्रज्ञान देण्याबाबत त्यांनी कोणतंही आश्वासन दिलं नाही.अमेरिकन उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ अधिक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुंबई हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. भारत आणि अमेरिकेला दहशतवादाचा समान धोका आहे, असं त्या म्हणाल्या. तर दहशतवादासह सर्वच मुद्द्यांवर भारत आणि अमेरिकेत परस्पर सहकार्य वाढवण्यावर एकमत झाल्याचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 19, 2011 06:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close