S M L

फ्रायडे रिलीज

13 नोव्हेंबर, 2008'दोस्ताना', 'दसविदानिया', 'प्राइड अ‍ॅण्ड ग्लोरी' आणि 'हंटिंग पार्टी' दोन हिंदी आणि दोन इंग्रजी सिनेमा रिलीज होत आहेत. बरेच दिवस सुरू असणा-या 'दोस्ताना'च्या प्रोमोज्‌मुळे सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. करण जोहरचा सिनेमा असल्यानं या सिनेमात खूप धमाल आहे. शिवाय नेहमीप्रमाणे प्रेम, मैत्री आहेच. आणि त्याचबरोबर गे विषय उघडपणे घेतलाय. प्रियांका चोप्रा, अभिषेक बच्चन आणि जॉन एब्राहम यांचा दोस्ताना पाहायला मिळणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन पहिल्यांदाच तरूण मनसुखनं केलं आहे. सिनेमाचं 'देसी गर्ल' हे गाणं आधीच हिट झालं आहे. 'दसविदानिया' हा विनोदी सिनेमा आहे. विनय पाठकनं अमर कौलची भूमिका साकारली आहे. मुंबईच्या गर्दीत हा अमर कौल एकदम हरवून जातो आणि एक एक गमतीजमती घडत जातात. शशांक शहानं सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. विनय पाठकची कॉमेडी पाहण्याचा सुंदर अनुभव पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. 'प्राइड अ‍ॅण्ड ग्लोरी' हा हॉलिवुडपट एका पोलीस अधिका-याच्या कुटुंबाभोवती फिरतो. एका भ्रष्टाचाराच्या खटल्याचा कुटुंबावर कसा परिणाम होतो, हे या सिनेमात आहे. एडवर्ड नॉर्टन, कोलीन फॅरेल यांच्या भूमिका आहेत.'हंटिंग पार्टी' सिनेमात रिचर्ड गेअरची मुख्य भूमिका आहे. यात त्याने पत्रकाराची भूमिका केली आहे. युद्ध कव्हर करणारा रिचर्ड शेफर्डनं दिग्दर्शन केलेल्या या सिनेमात भरपूर अ‍ॅक्शन आणि थ्रिलर आहे. या वीकेण्डला चांगले सिनेमे रिलीज होतायत. त्यामुळे चॉइसही खूप आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2008 04:28 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2008 04:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close