S M L

हॅरी पॉटर'चा जादूचा रेकॉर्ड ब्रेक 'गल्ला'

'सोमेन मिश्रा, मुंबई20 जुलैगेला आठवड्यात बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी दणदणीत ठरला. जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि हॅरी पॉटर या दोन्ही सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आपली शेवटची सफर करणार्‍या हॅरी पॉटरने तर रेकॉर्ड ब्रेक गल्ला जमवला आहेत. झोया अख्तर दिग्दर्शित जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमात एक नवीन कहाणी होती. ह्रतिक रोशन,फरहान अख्तर,अभय देओल,कतरिना कैफ,आणि कलकी यांची भूमिका असलेल्या या सिनेमाचे बजेट 55 करोड होतं. सिनेमाचं ओपनिंग झालं 60 ते 70% . शुक्रवारी या सिनेमाने 8.15 कोटी जमवले आणि पुढचे दोन दिवस सिनेमाला रिस्पॉन्स चांगला मिळाला. तीन दिवसात या सिनेमाने 28.42 कोटी इतका गल्ला जमवला. सिनेमाने सॅटेलाइट राईट्समुळे 24 कोटी तर म्युझिक राईट्समुळे 7 कोटी आधीच मिळवले. समीक्षकांनीही सिनेमाचं कौतुक केलं.तर दुसरीकडे हॅरी पॉटरमुळे वितरक आणि थिएटर मालकही खूश झाले. हॅरी पॉटरच्या शेवटच्या भागाला भारतात तुफान प्रतिसाद मिळाला. सिनेमाचे ओपनिंग 70 ते 80% झालं.वीकेण्डला या सिनेमाने 15 कोटी मिळवले. आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवरही सिनेमाने रेकॉर्डच केला. पहिल्या तीन दिवसात अमेरिका आणि कॅनडा इथे कलेक्शन झालं 168 मिलियन डॉलर्स. जगभरातील कलेक्शन 476 मिलियन डॉलर्सपर्यंत पोचलं. एकूणच हृा वीकेण्ड सिनेमांसाठी उत्तम ठरला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jul 20, 2011 03:31 PM IST

हॅरी पॉटर'चा जादूचा रेकॉर्ड ब्रेक 'गल्ला'

'सोमेन मिश्रा, मुंबई

20 जुलै

गेला आठवड्यात बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी दणदणीत ठरला. जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि हॅरी पॉटर या दोन्ही सिनेमांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आपली शेवटची सफर करणार्‍या हॅरी पॉटरने तर रेकॉर्ड ब्रेक गल्ला जमवला आहेत.

झोया अख्तर दिग्दर्शित जिंदगी ना मिलेगी दोबारा या सिनेमात एक नवीन कहाणी होती. ह्रतिक रोशन,फरहान अख्तर,अभय देओल,कतरिना कैफ,आणि कलकी यांची भूमिका असलेल्या या सिनेमाचे बजेट 55 करोड होतं. सिनेमाचं ओपनिंग झालं 60 ते 70% .

शुक्रवारी या सिनेमाने 8.15 कोटी जमवले आणि पुढचे दोन दिवस सिनेमाला रिस्पॉन्स चांगला मिळाला. तीन दिवसात या सिनेमाने 28.42 कोटी इतका गल्ला जमवला. सिनेमाने सॅटेलाइट राईट्समुळे 24 कोटी तर म्युझिक राईट्समुळे 7 कोटी आधीच मिळवले. समीक्षकांनीही सिनेमाचं कौतुक केलं.तर दुसरीकडे हॅरी पॉटरमुळे वितरक आणि थिएटर मालकही खूश झाले. हॅरी पॉटरच्या शेवटच्या भागाला भारतात तुफान प्रतिसाद मिळाला. सिनेमाचे ओपनिंग 70 ते 80% झालं.

वीकेण्डला या सिनेमाने 15 कोटी मिळवले. आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवरही सिनेमाने रेकॉर्डच केला. पहिल्या तीन दिवसात अमेरिका आणि कॅनडा इथे कलेक्शन झालं 168 मिलियन डॉलर्स. जगभरातील कलेक्शन 476 मिलियन डॉलर्सपर्यंत पोचलं. एकूणच हृा वीकेण्ड सिनेमांसाठी उत्तम ठरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2011 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close